Pune News: स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कैंसर) जनजागृती कार्यक्रमाचे आय.एम.ए.अध्यक्ष डॉ. रविंद्र कुटे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न !
आय.एम.ए.महाराष्ट्र च्यावतीने राज्यभर स्तन कर्करोगाबाबत जनजागृती महीना चे आयोजन
पुणे (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड येथील स्टरलिंग्स हॉस्पिटल याठिकाणी दिनांक २६ ऑक्टोबर रोजी महिलांच्या स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कैंसर) जनजागृती महिना कार्यक्रमाचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी डॉ.राकेश नेवे, डॉ. अनिरुद्ध टोनगांवकर, डॉ. शिंदे,डॉ.भलगट यांच्या समवेत वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, कर्मचारी आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.श्री.रवींद्र कुटे म्हणाले की,
स्तनाचा कर्करोग एकूण कर्क रोगाच्या १३.५% असतो. यांचे प्रमाण वाढत चालले आहे. शहरी रुग्ण २७ रुग्ण प्रति लाख व ग्रामीण प्रमाण ८ रुग्ण प्रति लाख असे आहे. सरासरी हा आजार होण्याचे प्रमाण पाश्चिमात्य देशात वय वर्ष ६० तर भारतात वय वर्ष ४६ असे आहे.
स्तनात कड़क लागणारी गाठ, स्तनाग्रातून लालसर स्त्राव तसेच स्तनाग्र आत खेचले जाणे, आकारमानात बदल होणे, काखेत गाठ येणे तसेच स्तनाग्रा भोवती संत्राच्या साली सारखी त्वचा होणे अशी प्राथमिक लक्षणे असतात. सर्व स्त्रीयांनी वयाच्या ४० नंतर या बाबत तपासणी करुन घ्यावी.असे आव्हानही डॉ रविंद्र कुटे यांनी केले.
तसेच उशीरा निदान झाल्यास उपचारावर खर्च वाढतो व उपाय योजना चांगल्या प्रकारे होत नाहीत.
२ ते ५% स्तनाचे कर्क रोग अनुवंशिक असतात त्यातही घरात पूर्वी २ किंवा ३ रुग्ण असतील तर प्रमाण वाढते
स्थूलपणा, जास्त वजन, आहारात चरबीयुक्त पदार्थ, मांसाहार, धूम्रपान, कोलेस्ट्रॉल किंवा गर्भनिरोधक गोळया ५ वर्षापेक्षा जास्त घेणे. व्यायामाची कमतरता, मद्यपान, तणाव व काळजी, वयाच्या ३० नंतर गर्भधारणा किंवा स्तनपान न करणे या सर्व स्तनाचा कर्करोग जोखीमेच्या गोष्टी आहेत.
महिलानी महिन्यातून एकदा स्तनाची तपासणी करणे गरजेचे आहे.छातीची तपासणी, गाठेची तपासणी, ( FNAC) mamography या तीन तपासण्या महत्वाच्या आहेत.
कर्करोग निदान झाल्यावर कीमोथेरेपी, रेडीयेशन थेरेपी, या उपचाराच्या मूलभूत पद्धती आहेत, सध्या स्तन न काढ़ता ते वाचवून शस्त्रक्रिया करणे (कॉजर्वेटिव ब्रेस्ट सर्जरी ) याला प्राधान्य दिले आहे.
स्तना च्या कर्क रोगा बाबत वाढते प्रमाण या बाबत जनजागृती म्हणून ओक्टोबर महिन्यामध्ये विविध ठिकाणी स्तन कर्क रोग जनजागृती महीना साजरा केला जातो. आय एम ए महाराष्ट्र राज्य याच्या विविध शाखांच्या माध्यमातून कर्करोगाबाबत जनजागृत केली जात आहे. महिलांच्या मध्ये गर्भाशय मुख़ाचा कर्करोग याचेही प्रमाण वाढते आहे. याबाबत सुद्धा जनजागृती, निदान, लसीकरण याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
(समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर )

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com