Sant Nirankari: ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानातंर्गत निरंकारी सेवादल कडून रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ
Sant Nirankari: अहमदनगर (प्रतिनिधी): भारत सरकारने राष्ट्रपिता गांधीजी यांना स्वच्छांजली वाहण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत ‘एक तारीख एक तास श्रमदान’ करण्याचे आवाहन केले होते. याच अनुषंगाने अहमदनगर रेल्वे प्रशासनाने संत निरंकारी मंडळाच्या नगर शाखा प्रमुख हरिष खुबचंदानी यांच्याशी संपर्क साधत स्टेशन परिसरात आयोजित सफाई अभियानात सहभागी होण्याची विनंती केली.
त्यांच्या विनंतीस मान देऊन निरंकारी सेवादल संचालक अनिल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली एक तुकडी रेल्वे स्टेशन येथे सकाळी 10 वा. हजर झाली. सुरुवातीला प्रार्थना म्हणत रेल्वे प्रशासनाचे सफाई कर्मचार्यांसोबत निरंकारी सेवादलने रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील परिसर, पार्किंग, प्लॅटफार्म तसेच तिकीट घर समोरील परिसरातून सफाई करत कचरा गोळा करुन परिसर स्वच्छ केला.
यावेळी स्टेशन प्रबंधक श्री. तोमर व उपस्थित रेल्वे अधिकारी यांनी निरंकारी सेवादलाच्या कामाचे कौतुक करीत म्हणाले की, दोन वर्षापुर्वी निरंकारी मंडळाच्यावतीने स्टेशन परिसरात शिस्तबद्धरित्या, नियोजनबद्ध सफाई अभियान राबवित परिसर स्वच्छ केला होतो. तो अनुभव लक्षात घेता, अपणास पुन:श्च सफाई अभियानात सहभागी होण्याची केलेली विनंती आपण मान्य करीत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद दिले.
संत निरंकारी मिशन तर्फे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने देशभरात वर्षभर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वननेस वन कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण, तसेच सफाई अभियानांतर्गत सार्वजनिक स्थळे, राष्ट्रीय स्मारके, पर्वतीय पर्यटनस्थळे, समुद्र, नदी किनारे आदि ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले जातात. अशा प्रकारे आध्यात्मिकते बरोबरच समाजोपयोग व मानवहिताच्या कार्यात संत निरंकारी मिशन नेहमीच अग्रेसर राहीले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com