Maharashtra News: जो बायडेनच्या प्रचारालाही एकनाथ शिंदे जाऊ शकतात : संजय राऊत



Maharashtra News: जो बायडेनच्या प्रचारालाही एकनाथ शिंदे जाऊ शकतात : संजय राऊत


जो बायडेनच्या प्रचारालाही उद्या एकनाथ शिंदे जाऊ शकतात कारण ते महान नेते आहेत. इतके महान नेते या राज्यात निर्माण झाले नाहीत. दुसऱ्या पक्षातून घेऊन २०१४ नंतर भाजपाने असे अनेक नेते  तयार केले.

 पण हे तात्पुरते आहेत. एवढंच नाही तर देशाला २०१४ मध्ये पनवती लागली जी २०२४ मध्ये संपणार आहे असाही टोला राऊत यांनी लगावला.


बेईमान आणि गद्दारांना हिंदूहृदय सम्राट म्हणायची नवी परंपरा एकनाथ शिंदे हे हिंदूहृदय सम्राट असतील पण त्यांनी असं काय महान कार्य केलं आहे ते आम्हाला पाहावं लागेल. सन्मानीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलं आहे. 


आम्ही त्यांचा संघर्ष पाहिला. बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोडी केल्या नाहीत, बेईमानी केली नाही. आता बेईमान आणि गद्दारांना हिंदूहृदय सम्राट म्हणण्याची परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पहावं लागेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


महाराष्ट्राची पनवती असलेले एकनाथ शिंदे बाहेर प्रचाराला जात आहेत

महाराष्ट्राची पनवती असलेले एकनाथ शिंदे बाहेर प्रचाराला जात आहेत. ते महाराष्ट्रातही हरणार आणि बाहेरही. २०१४ पासून देशाला पनवती लागली आहे. खासकरुन जे स्वतःला हिंदुत्व समजत आहेत त्यांना पनवती शब्दाबाबत अडचण वाटायला नको. जरा या शब्दाचा अर्थ समजून घ्या. भाजपाला या शब्दाचा राग यायला नको. २०१४ ला लागलेली पनवती २०२४ ला दूर होणार आहे.

 


काश्मीरमध्ये अतिरेकी दहशतवाद संपलेला नाही कुठे आहेत पंतप्रधान, कुठे आहेत गृहमंत्री? 

चार दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात दोन कॅप्टनसह चार जवानांना बलिदान द्यावं लागलं. याबाबत कुणीही संवदेना व्यक्त केली नाही. केंद्र सरकार पाच राज्यांमध्ये निवडणुका लढवण्यात दंग आहे. त्यांना काँग्रेस मुक्त भारत आणि शिवसेना मुक्त महाराष्ट्र करायचा होता पण ते झालं नाही. काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया आणि दहशतवाद संपलेला नाही. कुठे आहेत पंतप्रधान, कुठे आहेत गृहमंत्री? असाही सवाल संजय राऊत यांनी विचारला.