Top News

Meherbaba: अमिरेकेचे २०० सुफी मेहेरबाबा दर्शनासाठी अहमदनगरमध्ये

Meherbaba: अमिरेकेचे २०० सुफी मेहेरबाबा दर्शनासाठी अहमदनगर मध्ये  

Meherbaba: अमिरेकेचे २०० सुफी मेहेरबाबा दर्शनासाठी अहमदनगर मध्ये


Meherbaba: अहमदनगर (प्रतिनिधी)   अमेरिकेतील सेंट फ्रान्सिस्को,वाशिंग्टन डी सी येथील २०० सुफी लोक मेहेरबाबाच्या दर्शनासाठी ७ दिवस नगरमध्ये समाधीस्थळी आगमन झाले आहे हे लोक प्रथमच आले असून त्याचा अध्यात्मिक दौरा आहे अजून १०० लोकांचं दुसरा ग्रुप उद्या नगरमध्ये येणार आहे तीन वर्षानंतर प्रथमच परदेशी मेहेरप्रेमी एवढ्या मोठ्या संख्येने आले आहेत.  


             दि २० रोजी हा ग्रुप पुणे येथे आला त्यांनी मेहेरबाबांचे जन्मस्थान ससून रुग्णालयातील रूमला भेट दिली तसेच बाबांचे निवासस्थान व पुणे सेंटरला पण भेट देऊन दुसऱ्या दिवशी अहमदनगर मेहेराबादला आगमन झाले. अवतार मेहेरबाबाचे जीवन ते समजून घेणार आहेत. 


आज त्यांनी अहमदनगर मधील झेंडीगेट येथील बंद पडलेली दीपाली टॉकीज मागे सरोश पेट्रोल पंप शेजारील जेथे अवतार मेहेर बाबा यांनी आपल्या जीवनातील अनेक स्मरणीय क्षण आणि अविस्मरणीय जीवन  व्यतीत केला, बाबांच्या जगभरातील अनुयायी यांना याठिकाणाहून मेहेर बाबानी ज्ञान दिले या ठिकाणाशी बाबांना विशेष प्रेम असल्याचे अनेक उदाहरणे आणि छायाचित्रे आजही उपलब्ध आहेत अशा अवतार मेहेरबाबा केंद्राला भेट दिली. यावेळी डॉ मेहरनाथ कलचुरी,राज कलचुरी,जेनेस रेमन,जायना टॉमकीन व नगर सेंटरचे कार्यकर्ते यांनी सर्वांचे स्वागत केले येथील विविध ठिकाणाची त्यांनी माहिती घेतली

Meherbaba: अमिरेकेचे २०० सुफी मेहेरबाबा दर्शनासाठी अहमदनगरमध्ये



            डॉ कलचुरी यांनी बाबाची माहिती दिली ते म्हणाले  मेहरबाबा जगात फिरले पण त्यांनी अहमदनगरची भूमी निवडली व येथेच स्थिरावले ते नगरजवळील वांबोरी रोडवरील पिपळगाव माळवी येथील आश्रमात राहत असत तर त्याची समाधी अरणगाव येथे मेहेरबाद येथे आहे याठिकाणी सतत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी व शांतीसाठी राज्यातून,भारतातून व जगातून येत असतात तसेच त्यांनी  त्यांच्या कार्या विषयी,त्याचा आध्यत्मिक प्रवासा विषयी माहिती दिली 


          मेहेरबाबाचे  असंख्य भक्त आज भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा आहेत. तसेच असंख्य आश्रमही आहेत.अवतार मेहेरबाबा सर्व धर्मावर प्रेम,सर्व धर्माची पूजा करीत,परंतु आपण कोणत्याच धर्माचे नाही किंवा कोणता नवीन धर्म स्थापन करुन मानवाला मानवा पासुन वेगवेगळे करुन त्यांच्यात भ्रम वाढवु इच्छित नाही असे मेहेरबाबा म्हणत.


        हे मेहेरप्रेमी समाधीच्या शांतमय  परिसरात आपला सर्व वेळ व्यथित करणार असून बांबोरी रोडवरील मेहेराझाद,बाबांचे सदगुरु साकोरीचे उपासनी महाराज,शिर्डी साईबाबा ,केडगाव बेट नारायण महाराज च्या ठिकाणी भेट देणार आहेत तर २६ तारखेला पुन्हा अमेरिकेत जाणार आहेत तसेच उद्या परदेशी सुफी १०० लोकांचा ग्रुप नगरमध्ये येणार आहे 

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने