Ph.D.: डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा.प्रसाद घुगरकर यांना पी.एच.डी.प्रदान
Ph.D.: अहमदनगर (प्रतिनिधी) वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे सहाय्यक प्राध्यापक प्रसाद घुगरकर यांना ज्ञान विहार विद्यापीठ, जयपूर विद्यापीठातून औषधनिर्माण शास्त्र विषयातून पी.एच.डी. प्रदान करण्यात आली.
प्रा.प्रसाद घुगरकर यांचा ‘फॉरम्युलेशन अॅण्ड ऑप्टीमायझेशन ऑफ पी.एच.डिपेंडन्ट ड्रग डिलिवरी सिस्टीम फॉर ड्युएल रिलीज ऑप्टीमायझेशन कन्टेनींग प्रोटॉन पम्प इनिहीबीटर’ हा प्रबंधाचा विषय होता. त्यांना जयपूर येथील ज्ञान विहार विद्यापीठातील डॉ.प्रिती धुळवे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.प्रसाद घुगरकर यांची पी.एचडी. 2023 मध्ये पूर्ण झाली. या दरम्यान त्यांनी तीन पेटंट आणि फार्मास्युटीक्स या विषयावर पुस्तक सुद्धा प्रकाशित केले.
‘मेडिकल डिव्हाईस फॉर कोल्ड स्टोरेज ऑफ फ्लूइडस्’, ‘धेरापेटीक डेरिव्हेटिव्ह ऑफ सल्फामिथोक्साझोल’, ‘फार्मास्युटीकल फॉर्म्युलेशन ऑफ फॅमोटीडीन अॅण्ड ईटस् यूज’ यात पेटंट मिळाले. डॉ. प्रसाद घुगरकर यांच्या पी.एच.डी. पदवी मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, डायरेक्टर साई पाउलबुधे, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
बी.एड.च्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डी.फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com