MSHFC: दी महाराष्ट्र स्टेट को-ऑप हाऊसिंग फायनान्स कार्पो.च्या
संचालकपदी प्रा.शैलजा लोटके यांची फेरनिवड
MSHFC: अहमदनगर (प्रतिनिधी) - दी महाराष्ट्र स्टेट को-ऑप हाऊसिंग फायनान्स कार्पो.लि. मुंबई या संस्थेची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. यामध्ये अहमदनगर येथील विद्यमान संचालिका प्रा.शैलजा सुनिल लोटके यांची संचालकपदी बिनविरोध फेरनिवड झाली.
यापुर्वी श्री.किसनराव लोटके यांनी हाऊसिंग फायनान्स कॉर्पो.चे संचालकपद 30 वर्षे भुषविले असून, त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. प्रा.शैलजा लोटके यांनी मागील 5 वर्षात अहमदनगर जिल्हा व महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्थांशी संपर्क ठेवून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचाच वारसा त्यांच्या स्नुषा प्रा.शैलेजा लोटके पुढे चालवत आहेत.
दी महाराष्ट्र स्टेट को-ऑप हाऊसिंग फायनान्स कार्पो.चे संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीसाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.प्रविण दरेकर, माजी आ.अंकुश काकडे यांनी प्रयत्न केले.या निवडीबद्दल प्रा.शैलजा लोटके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com