RepublicDayIndia: पहा 'छत्रपती शिवाजी महाराज’  चित्ररथ ; आजचे पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी केला व्हिडीओ ट्विट पहा 

RepublicDayIndia: पहा 'छत्रपती शिवाजी महाराज’  चित्ररथ ; आजचे पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी केला व्हिडीओ ट्विट पहा



RepublicDayIndia: प्रजासत्ताकदिन निमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष महोत्सवानिमित्त ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी झाला.




नवी दिल्ली : Republic Day 2024 : आज स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे. यानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण आहे. यावर्षी केंद्र सरकारने 'विकसित भारत' आणि 'भारत-लोकशाहीची जननी' या दुहेरी संकल्पनेवर आधारित, यावर्षीच्या संचलनामध्ये सुमारे 13,000 विशेष पाहुण्यांचा सहभाग असणारा उपक्रम आयोजित केला आहे. हा उपक्रम सर्व स्तरातील लोकांना या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणारा आणि सरकारमधील लोकसहभागाला प्रोत्साहन देणार राहणार असेल असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय.


75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, युनायटेड स्टेट्स, इस्रायल आणि रशिया यासारख्या विविध देशांच्या राजदूतांनी भारताला शुभेच्छा दिल्या आणि नवी दिल्लीशी संबंध अधिक समृद्ध करण्याचे आवाहन केले. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारताचे अभिनंदन केले आणि भविष्यातील भागीदारी निर्माण करण्यावर भर दिला.



प्रथमच, 100 हून अधिक महिला कलाकार भारतीय वाद्ये वाजवून पथसंचलनाची सुरुवात करणार आहेत. या महिला कलाकारांद्वारे वाजवल्या जाणार्‍या शंख, नादस्वरम, नगारा इत्यादी वाद्य संगीताने संचलनाची सुरुवात होईल. कर्तव्यपथावर पथसंचलनामध्ये पहिल्यांदाच तिन्ही संरक्षण दलातील महिलांच्या एकत्र तुकडीचा सहभाग देखील पाहायला मिळणार आहे. महिला वैमानिकही नारी शक्तीचे प्रतिनिधित्व करत हवाई संचलनादरम्यान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ)तुकड्यांमध्ये केवळ महिला जवान असणार आहेत. 


आजचे पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी केला व्हिडीओ ट्विट पहा  

भारतीय वायुसेनेतील ६ राफेल विमान