Ahmednagar NCP: आ संग्राम जगताप यांची शहरातून बाईक रॅली
अहमदनगर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली. माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
बाईक वर असणारे भगवे झेंडे, भगवे उपरणे, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा यामुळे अवघं वातावरण शिवमय झाले होते.
यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, पक्षाचे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com