Ahmednagar Railway: रेल्वे विभाग पुण्याला जोडला गेल्याने नगरकरांची वेळ आणि पैशांची बचत होणार - सुदर्शन डुंगरवाल
अहमदनगर (प्रतिनिधी) - मनमाड-दौंड रेल्वे मार्ग एप्रिल पासून मध्य रेल्वे मंडल सोलापुर ऐवजी पुणे विभागाला जोडला जाणार आहे. त्यामुळे अहमदनगर-पुणे कनेक्टीव्ही वाढणार आहे. नगर-पुणे सेवेचामार्ग आणखी सुखकर होणार आहे, अशी प्रतिक्रिया सेंट्रल रेल्वे मुंबई सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी दिली.
दौंड रेल्वे स्थानाकपासून मागे 3 कि.मी. अंतरावर कॉर्डलाईन वरुन नगर-पुणे प्रवास हा सुरळीत होणार आहे, त्यामुळे दीड तासात पुण्याला जाणे शक्य होईल. त्याचप्रमाणे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांची फरफट थांबणार आहे.
कारण रेल्वे संदर्भातील प्रशासकीय कामांकरीता सोलापुरला 225 कि.मी.जावे लागत होते. परंतु आता पुणे विभागाला जोडला गेल्याने हेच अंतर निम्मे होणार आहे. त्यामुळे नगरकरांची वेळ आणि पैशांची बचत होणार असल्याचे श्री.डुंगरवाल यांनी सांगितले.
त्याप्रमाणे दुहेरीकरणाचे काम 85 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. भविष्यात आणखी वेळ वाचणार आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com