भव्य शोभायात्रा व तिरुपती देवस्थान प्रमाणे होणार विवाह सोहळा

Ahmednagar Tirupati Balaji: अहमदनगरमध्ये तिरुपती बालाजी विवाह सोहळ्याची जय्यत तयारी



           अहमदनगर (प्रतिनिधी)- तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्यांचे  आगमन नगरमध्ये   दि. २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.शिल्पा गार्डन येथे श्री बालाजीचा श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाह) सोहळ्याचे आयोजन संध्याकाळी करण्यात आले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने जसा नित्य श्री बालाजीचा श्रीनिवास कल्याणोत्सव होतो तशाचा तसा सोहळा येथे होणार आहे. 


अहमदनगरच्या भाविकांना प्रथमच विवाह सोहळ्याची अतिदुर्लभ पर्वणी यानिमित्त मिळणार आहे. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. तर  हजार भाविकांची दर्शनास येणार असून त्याची  दर्शनाची सोय करण्यात आली आहेअशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक व तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पत्रकारशी बोलताना  दिली.यावेळी नियोजन समितीचे संजय ताथेडअनिल लुंकडकिरण राकाअजित बोथराअमित मुथाआशिष खंडेलवालपियुष मुथासुधीर मुनोतअभिजित कोठारीसिए. रवींद्र कटारिया महेश गुगळे व धनेश कोठारी आदि उपस्थित होते.


           पुढे बोलताना सौरभ बोरा पुढे म्हणालेयानिमित्ताने भव्यदिव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. २७ फेब्रु रोजी सायं ६ वा देवाच्या विवाह सुरवात होणार आहे. सुमारे २ तासाचा हा धार्मिक विधी आहे. या सोहळ्याच्या पौरोहित्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानचे ७० पुजारी येणार आहेत. तत्पूर्वी  दु ४ वा बडीसाजन मंगल कार्यलय ते शिल्पा गार्डन दरम्यान भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 


यामध्ये  आकर्षक भव्य रथात श्री तिरुपती बालाजीपद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्या ठेवण्यात येणार आहेत. या शोभायात्रेत उंटघोडेढोलपथकलेझीम पथकदांडिया पथकतुलसी वृंदावन व मंगल कलश घेतलेल्या महिला आदींसह दक्षिण भारतातील पारंपरिक वाद्यवृन्दांच्या पथकाचा समावेश असणार आहे. यात मोठ्या संख्यने नागरिक व महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत.


          हा सोहळा सर्वाना व्यवस्थित बघता यावा यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगनागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.  तसेच गाड्यांच्या पर्किगीची व्यवस्था करण्यात आली आहेव  भाविकांना तिरुपती देवस्थानचा लाडू प्रसाद व विवाह सोहळ्या नंतर पोंगल प्रसाद मिळणारआहे. 


हा सोहळा यशस्वी होण्यासाठी  स्वयंसेवक, कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.व  जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलीस अधिक्षक राकेश ओला, मनापा आयुक्त पंकज जावळे यांचे सहकार्य मिळत आहे