Ahmednagar Women's BJP : भाजप शहर महिला आघाडीच्या गौतमनगर शाखेचे उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी) - केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्यांसाठी विविध लाभदायक योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ अनेकांना होत आहे. विशेषत: महिलांसाठीच्या योजनांमुळे महिला आत्मनिर्भार होत आहेत. नगरमध्येही भाजपा महिला आघाडीचे चांगले काम सुरु असून, स्टेशन रोड परिसरात मंडल अध्यक्ष सुरेखाताई खैरे यांनी महिलांचे चांगले संघटन केले असून,
आज महिला आघाडीची दुसरी शाखेचे सुद्ध माझ्यास हस्ते उद्घाटन होत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या शाखेच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन, शासनाच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून द्यावा. आपल्या अडचणी सोडविण्यासाठी मी सर्वोतोपरि प्रयत्न करेल, असे प्रतिपादन भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.
भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहर महिला आघाडीच्या स्टेशन रोड येथील गौतमनगर शाखेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विशाल खैरे, भागवत कुरधने, विजय घासे, विजय गायकवाड, पंडित खुडे, देविदास मेहत्रे, प्रविण भापकर, केडगाव मंडल महिला अध्यक्षा सुरेखा खैरे, उपाध्यक्षा अश्विनी गायकवाड, शाखाध्यक्षा सुरेखा खुडे, नंदा शिंदे, मिरा शिंदे, विमल गायकवाड, उपाध्यक्षा संगिता साळवे, ताराबाई शिंदे, सरचिटणीस किर्ती काकडे, नंदाबाई गायकवाड, नंदा हजारे, लता इंजिनवारे, मनिषा नन्नवरे, अनिता खुडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अभय आगरकर म्हणाले, स्टेशन रोड परिसरात विशाल खैरे हे भाजपा पक्षाचे काम चांगल्या प्रकारे करत असून, विविध उपक्रमातून नागरिकांचे मोठे संघटन उभे केले आहे. महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सुटत असल्याने महिलांही पक्षाशी जोडल्या जात आहे. त्यामुळेच आज दुसर्या शाखेचे उद्घाटन होत आहे, ही विशाल खैरे व सुरेखा खैरे यांच्या कामाची पावती असल्याचे सांगितले.
याप्रसंगी विशाल खैरे म्हणाले, ज्येेष्ठ नेते सुर्यकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 15 मध्ये दुसरी महिला शाखाचे उद्घाटन चित्राताई वाघ यांच्या हस्ते होत आहे. या शाखेच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगिण विकास साधला जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी शाखेच्या पदाधिकारी कार्यरत आहेत. पक्षाचे काम जनसामान्यांपर्यंत पोहचविले जाते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा खुडे यांनी केले तर किर्ती काकडे यांनी आभार मानले. याप्रसंगी परिसरातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com