निधी उपलब्ध झाल्याने प्रलंबित कामे मार्गी लागतील-अक्षय कातोरे
अहमदनगर (प्रतिनिधी) - प्रभाग क्रमांक 7 मधील बोल्हेगाव-नागापूर परिसरातील गणेश चौक ते आंबेडकर चौक रोडचे खडीकरण व डांबरीकरण, तसेच गणेश चौक येथील ज्ञानेश्वर मंदिरात सभा मंडपाचे उद्घाटन शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख आकाश दादा कातोरे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी लोभाशेठ कातोरे, बर्डे साहेब, शिवाजी आभाळे, बोरुडे मामा, शिंदे मामा, धामणे मामा, माजी सरपंच कापडे, सुभाष धामणे, भाऊ जगताप, विष्णू पोपळे, दादा खिळे, बर्डे साहेब, अकोलकर महाराज, श्री गायकवाड, भारत वामन, श्री.पवार, श्री.वांडेकर, विजय कलापुरे, फिरोज शेख, नामदेव खंडागळे, राहुल शिंदे गायकवाड मेजर, गावडे महाराज आदि उपस्थित होते.
यावेळी युवा सेनेचे आकाश कातोरे म्हणाले,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांसाठी एक कोटी 84 लाख रुपयांचा भरीव निधी बोल्हेगावं गाव परिसरातील रस्ता डांबरीकरण, मंदिराच्या सभा मंडपासाठी उपलब्ध झाला आहे. बोल्हेगांव येथील रस्त्यांची समस्या अतिशय दयनीय व बिकट होते. या समस्येवर वेळोवेळी महापालिकेमध्ये देखील पाठपुरावा केला, परंतु मनपा पदाधिकारी व प्रशासनाने कोणतीही प्रकारे या रस्त्या संदर्भात दखल न घेतल्याने या ही कामे प्रलंबित होते. आता या कामासाठी निधी मिळाल्याने हा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
यावेळी माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांनी देखील बोल्हेगांवसाठी खा. सुजय विखे व ना. राधाकृष्ण विखे यांनी निधी दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले. या निधीच्या माध्यातून होणार्या कामांमुळे प्रलंबित कामे पुर्ण होणार असल्याचे समाधान आहे. येणार्या काळामध्ये बोल्हेगांव परिसरातील नागरिक समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे सांगितले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com