Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला ; या आहेत महत्वाच्या घोषणा
Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यावेळी महिला वर्ग आणि तरुणांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या
आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही - अर्थमंत्री
करदात्यांचे आभार मानत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नव्या कर प्रणालीनुसार 7 लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करास पात्र नसेल असं स्पष्ट केलं. थोडक्यात यंदा जुनीच कर प्रणाली लागू राहणार असून, आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
निर्मला सीतारमण यांनी काय सांगितल्या तरतूदी ?
सरकार नेक्स्ट जेनरेशन रिफॉर्म आणणार
गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक क्षेत्र सज्ज
पुढच्या 5 वर्षांत गरीबांसाठी 2 कोटी घरं बांधणार
MSME साठी व्यावसाय सोपा करण्यासाठी काम सुरू
रूफटॉप सोलर प्लान अंतर्गत 1 कोटी घरांना 300 यूनिट/महिना फ्री वीज
देशात जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार
सर्वाइकल कॅन्सरसाठी लसीकरण वाढविलं जाईल,
नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढविला जाईल
डेअरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच योजना आणणार
बजेटमध्ये महिलांसाठी काय?
Momentum for Naari Shakti ....
Empowerment of women through entrepreneurship, ease of living & dignity for them has gained momentum in 10 years. Making Triple Talaaq illegal, making women joint or sole owners of homes under PM Awaas yojna has helped empower women @nsitharaman pic.twitter.com/9CLgPsC0Cp
— SansadTV (@sansad_tv) February 1, 2024
-
Momentum for Naari Shakti ....
Empowerment of women through entrepreneurship, ease of living & dignity for them has gained momentum in 10 years. Making Triple Talaaq illegal, making women joint or sole owners of homes under PM Awaas yojna has helped empower women @nsitharaman pic.twitter.com/9CLgPsC0Cp
महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार
पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरं महिलांना
1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत.
त्या अन्य महिलांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत.
लखपती दीदीचे लक्ष्य 2 कोटींवरून वाढवून 3 कोटी करण्यात आले आहे.
बजेटमध्ये आणखी काय?
तीन हजार नवे आयटीआय खुले केले
15 नवी एम्स रुग्णालये तयार करणार
पाच एकात्मिक ॲक्वा पार्क स्थापन करणार
पुढील दोन वर्षांत दोन कोटी घरे बांधणार
सौर ऊर्जा योजनेद्वारे 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज देणार
'या' योजनेंतर्गत आणखी दोन कोटी घरं बांधली जाणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, जनधन खात्यांमध्ये पैसे जमा करून 2.7 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. सरकारचे आर्थिक व्यवस्थापन इतकं उच्च पातळीचं आहे की, त्यामुळं देशाला नवी दिशा आणि नवी आशा मिळाली आहे. देशातील सर्व राज्य आणि घटकांना एकत्रितपणे देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारनं व्यवस्था केली आहे. देशातील महागाईबाबतच्या कठीण आव्हानांवर मात करण्यात येत असून महागाईचे आकडे खाली आले आहेत.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com