डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अ‍ॅपल सेंटर ऑफ एक्सलन्सचे बक्षिस वितरण संपन्न

डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अ‍ॅपल सेंटर ऑफ एक्सलन्सचे बक्षिस वितरण संपन्न




    अहमदनगर (प्रतिनिधी)   - अहमदनगर जिल्हयातील पहिले अधिकृत अ‍ॅपल सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्र  डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने यशस्वीरित्या सुरु केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून  उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले जात आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना आवश्यक ते ज्ञान मिळत असून, करिअरच्या संधी उपलब्ध होत आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाचा स्विकार करुन त्या पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाल्यास त्याची पुढील वाटचाल ही सोपी होते. आज या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चालू घडामोडीचे ज्ञान मिळत असल्याने शिक्षण पुर्ण झाल्यावर नोकरीची मोठी संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन प्रभारी सेकेटरी डॉ. पी एम गायकवाड यांनी केले.


     विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अ‍ॅपल सेंटर ऑफ एक्सलन्सचे बश्विस वितरण उत्साहात संपन्न झाले. यावेळी संस्थेचे प्रभारी सेकेटरी डॉ. पी.एम.गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पीटल व मेडिकल कॉलेजचे अ‍ॅडमिनीस्ट्रेटिक ऑफीसर डॉ. आर. के. पडळकर,  उपसंचालक सुनिल कल्हापुरे व प्राचार्य डॉ. उदय नाईक आदी उपस्थित होते.


     अ‍ॅपल सेंटर ऑफ एक्सलन्स है अहमदनगर जिल्हयातील पहिले अधिकृत केंद्र असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वीफ्ट प्रोग्रामींग लैंग्वेजचे कोर्सेस आयोजित करत आहेत. या अंतर्गत झालेल्या प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आली.


     यावेळी सुनिल कल्हापुरे म्हणाले, कॉम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पायथन लैंग्वेज तसेच अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप डेव्हलपमेंटचे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःया सर्वांगीण विकास करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान अंगिकारले पाहिजे तरच या संगणकीय युगात आपण स्वतःला सिध्द करु शकू. 


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी किचकट असलेल्या या परीक्षेत प्राविण्य मिळवल्याबद्दल विशेष कौतुक करुन या अ‍ॅपल सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत वातानुकुलित प्रयोगशाळा य आयमॅक चे संगणक असलेली अतिशय सुसज्ज अशी नगर जिल्हयातील एकमेव प्रयोगशाळा उपलब्ध आहे असे प्रा. सुनिल कल्हापुरे यांनी नमुद केले.


     समन्वयक डॉ. संदिप उदावंत यांनी आयओएस अ‍ॅल्पिकेशन डेव्हलपमेंटसाठी आवश्यक स्वीफ्ट प्रोग्रामींग लैंग्वेज कन्सेप्ट बद्दल सखोल माहिती दिली.


     अ‍ॅपलने नियुक्त केलेले अधिकृत ट्रेनर प्रा. रविंद लवांडे यांनी हा कोर्स केल्यानंतर विविध रोजगारांच्या संची उपलब्ध असून त्यात अग्रस्थानी अ‍ॅपल इंडिया, टी सी एस असेचर, फोन पे, हेक्झावेअर टेक्नॉलॉजीजू, इन्फोसिस, हर्मन इंटरनॅशनल, सिनेकॉन, मायक्रोसॉफ्ट, सिमेन्स व टेक महिन्द्रा व बर्‍याचशा संगणक क्षेत्रातील यशस्वी कंपन्यांचा समावेश होतो. या अभ्यासक्रमामध्ये तीन मॉडयूलचा समावेश आहे. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांचा बायोडाटा बळकट होईल असे सांगितले.


      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अ‍ॅपल सेंटर ऑफ एक्सलन्सचे समन्वयक डॉ संदिप उदावंत, प्रा. अविनाश पुंड, प्रा. ज्योती बोटकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला पुणे विद्यापिठाच्या अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ.आर.आर. नवथर, डॉ. एम. पी. वाघ, डॉ.डी.ए. विधाते, डॉ. ए.आर लावरे,  विभागप्रमुख डॉ. यु.आर कवडे, डॉ. ए.के. पाटील, प्रा. एन. बी विखे व प्रा.आर. एस.तांबे तसेच ट्रेनिंग अ‍ॅण्ड एलेसमेंटचे प्रा.एस.आर. दिवटे आदी उपस्थित होते.


     संस्थेचे चेअरमन ना. राधाकृष्ण विखे पाटील, चिफ एक्झीक्युटीव्ह ऑफिसर खा. डॉ सुजय विखे पाटील, संचालक डॉ.अभिजीत दिवटे   यांनी या उपक्रमास खूप शुभेच्छा देऊन सर्वांचे अभिनंदन केले.