पतंजलीच्या वतीने नवीपेठेत निशुल्क चिकित्सा शिबीर

Health Camp: नागरिक आयुर्वेदाकडे वळत आहे- आ. संग्राम जगताप



 अहमदनगर (प्रतिनिधी)-स्वामी रामदेव बाबा, आचार्य बाळकृष्ण च्या पतंजली योगपीठ च्या सहकार्याने पतंजली योगपीठ मधील प्रशिक्षित वैद्य द्वारे अहमदनगरमधील नवीपेठ येथे निशुल्क चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले त्याचे उदघाटन आ संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

         यावेळी चंदा पारिक, पवन शेठ पारिक ,डॉक्टर मुरलीधर काबरा ,राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर ,प्रा माणिक विधाते,साहिल नहार,संकेत तांबोळी,विनोद शर्मा,वैशाली पाताळे,शारदा मडुर आदींसह मोठ्या संख्नेने रुग्ण व नागरिक उपस्थित होते.
                

         आ.जगताप म्हणाले नागरिक आयुर्वेदाकडे वळत आहे बरेच जण आयुर्वेद औषध घेत आहे तर अनेक जण पतंजलीची उत्पादने वापरत आहे त्यामुळे त्रास दूर झाला आहे नवीपेठतेतील या निशुल्क चिकित्साचा फायदा होणार आहे.

              पवन पारिक म्हणाले आमच्या पतंजली चिकित्सालयाच्या वतीने हे निशुल्क शिबीर घेण्यात येत असून ते पुढील महिनाभर चालणार आहे त्याचा नगरकरांना , रुग्णांनी फायदा होणार आहे ज्यांना तपासणी करावयाची आहे त्यांनी पतंजली चिकित्साल, मुनोत चेंबर,नवीपेठ ,नगर मो ९४२०३४४७७७ वर संपर्क साधावा