श्रीमार्कंडेय मंदिर देवस्थान व मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्या -वतीने महाप्रसाद वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी) - श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिरात श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने भव्य महाप्रसाद (भंडारा) चे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचे 4000 भाविकांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने पद्मशाली समाजातील प्रसिद्ध असलेले पप्पु-बुव्वा मिष्ठान्न भोजन करण्यात आले. यामध्ये भात, वरण, चपाती,भाजी शिरा असे पदार्थ ठेवण्यात आले होते. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त देवस्थानच्यावतीने सकाळ पासुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 7 वाजता ऋद्राभिषेक, स.8 वा.होमहवन, सकाळी 10 वा.सत्यनारायण महापुजा, स.11 वा.आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप शिव कन्स्ट्रक्शनचे संचालक इंजि.अक्षय बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या १४ वर्षापासून मार्कंडेय जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. तसेच वर्षभरात विविध सामाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबीर, नेत्रतपासणी शिबीर, वृक्षरोपण कार्यक्रम, महाआरती उपक्रम, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम प्रतिष्ठाणच्या वतीने घेण्यात येतात, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै.शुभम सुंकी यांनी सांगितले.
जयंती उत्सवा यशस्वीकेरण्यासाठी देवस्थानचे ज्ञानेश्वर मंगलारम,पदाधिकारी व प्रतिष्ठानचे अमित गाली,अजय लयचेट्टी, श्रीनिवास बुरगुल,योगेश न्यालपेल्ली,प्रणव बोज्जा,ओमकार मेरगू,राजु म्याना, प्रविण सुंकी,आनंद गाली,सुमित गाली,संजय नुती,सुजल कुरापटटी,केतन इराबत्तीन,आकाश बिज्जा,आंबादास गोटीपामुल,सागर सब्बन,शिवानंद गाली,शुभम दडगे,व्यंकटेश नक्का,यश इराबत्तीन,आदींनी विशेष परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com