Pune News: पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune News: पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

 


पुणे,  :  पुणे शहर आणि परिसरात वाढलेली गुन्हेगारी अटोक्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून नवा प्लॅन तयार करण्यात येत आहे. पुणे पोलिसांची आता गुन्हेगारांवर गुप्त नजर असणार आहे. त्यासाठी पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे.


गुन्हेगारीच्या घटना नियंत्रणात आणून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना केली जाणार आहे. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखा आणि सायबर शाखेतील कर्मचाऱ्यांना एकत्रित करून या नव्या युनिटीची स्थापना केली जाणार आहे. 


या अंतर्गत पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गुन्हेगाराचं सोशल मीडिया अकाउंट पुणे पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलीस दलाकडून ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली.


दरम्यान काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सर्व कुख्यात गुन्हेगारांची पुणे पोलिसांकडून परेड काढण्यात आली होती. त्यांना समज देण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून गुन्हेगारीवर नियंत्रण आणि गुन्हा करणाऱ्यांवर कायदा आणि पोलिसांचा धाक राहावा यासाठी तसेच गुंड आणि गुन्हेगार हे शहर आणि परिसरात जनसामान्य लोकांवर दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाना पोलिसांचा खाक्या काय असतो ते या नवीन प्लॅननुसार दाखविण्यात येणार आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था पुण्यात निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उत्तम पर्याय समजण्यात येत आहे.