Sangamner News: अंजुमन इस्लाम ट्रस्ट संगमनेरच्या मुख्य विश्वस्तपदी अब्दुल्लाह चौधरी व सचिवपदी हाजी शौकतखान यांची नियुक्ती
संगमनेर (प्रतिनिधी) : अंजुमन इस्लाम ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदी अब्दुल्लाह चौधरी व संस्थेच्या सचिव पदी हाजी शौकतखान पठाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल संगमनेर येथील जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटर,संघर्ष सेवाभावी संस्था, सम्मान समिती, सहारा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲंग्लो ऊर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष श्री.शेख गनी हाजी शेठ होते.
यावेळी संघर्ष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संग्राम जोंधळे यांनी भाषण केले. नवनियुक्त चिफ ट्रस्टी अब्दुल्लाह चौधरी यांनी आपल्या भाषणात अनेक पैलूंवर प्रकाश टाकला व संस्थेचे संस्थापक शेख लाल मास्टर यांनी १९१२ मध्ये संस्था स्थापन करून व येथील जेष्ठ मंडळींनीं संस्थेची प्रगती कशी केली,व भविष्यात कशी पुढे वाटचाल करणार याची माहिती दिली.
सुत्रसंचलन आपल्या शायरीतुन नेहरू सेंटरचे शेख ईदरीस यांनी केले.यावेळी नवनियुक्त सचिव हाजी शौकतखान पठाण, सय्यद असिफ अली, माजी नगरसेवक शेख हबीब बाबु, दत्ता कांडेकर, मुनव्वर सर, इत्यादींची भाषणे झाली., युनुस चौधरी,शानु बेगमपुरे,कमरोद्दीन मणियार,मियां सय्यद पुणे आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com