मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत सटाले वस्ती जि.प.शाळेचे यश ; तालुका स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे बक्षिस
अहमदनगर (प्रतिनिधी) - कर्जत तालुक्यातील सटाले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत तालुक्यातून दुसर्या क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे बक्षिस मिळविले. याप्रसंगी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे, शालेय व्यवस्थापन समितीचे अभिनंदन केले.
तसेच शालेय विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये शाळेतील पुर्वी मेटे व चैतन्य गांगर्डे या विद्यार्थ्यांची वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड झाली.
या उपक्रमासाठी शिक्षक नवनीत गायकवाड, संदिप बाबर, विलास घोडके, संगीता दाते, शिल्पा गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पाराजी मेटे व सदस्यांनी परिश्रम घेतले.
शाळेला मिळालेल्या या बक्षिसाबद्दल विविध स्तरातून विद्यार्थी, शिक्षक, शालेय समितीचे अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com