Ahmednagar Banks: अहमदनगर जिल्हा बँक्स असोसिएशन संचालकपदी विष्णू फुलसौंदर निवड
अहमदनगर - अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या विष्णू फुलसौंदर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी नगर तालुका उपनिबंधक बी.बी.सिनारे, अधिकारी विशाल अळकुटे,
बँक्स असोसिएशनचे चेअरमन सीए गिरिष घैसास, प्रकाश राठी, आशा मिस्कन, प्रा.मेघा काळे, संजय बोरा, सिताराम झिने, संजय घुले आदि उपस्थित होते.
रिक्त असलेल्या इतर मागासवर्ग प्रतिनिधी पदासाठी विष्णू फुलसौंदर यांच्या नावाची सूचना सीए गिरिश घैसास यांनी मांडली त्यास प्रकाश राठी यांनी अनुमोदन दिले.
विष्णू फुलसौंदर हे गेल्या अनेक वर्षांपासून भिंगार बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीनंतर त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com