वंडर किड्स प्री स्कुल मध्ये सायन्स डे साजरा : डॉ . छाया भालसिंग यांच्या हस्ते उदघाटन
अहमदनगर (प्रतिनिधी) : सध्या बहुतेक सगळ्यांच्याच जीवनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा बोलबाला असल्याचे दिसते आहे. लहान मुले तर हे अगदी सहज वापरतातच आणि त्यांचे पालक देखील मुलांचा अभ्यास घेताना त्यांचे प्रोजेक्ट्स, प्रॅक्टिकल्स आणि उपकरणे तयार करताना ' ए आय ' टुल्स ची मदत घेताना दिसत आहेत.
सावेडीतील पाईप लाईन रोडवरील तुळजाभवानी मंदिरापाठीमागे असलेल्या वंडर किड्स प्री स्कुल मध्ये साजऱ्या झालेल्या सायन्स डे मध्ये ' ए आय ' टुल्स वापरून इंटरनेट, सोशल मीडियावरील माहिती आणि छायाचित्रांचा आधार घेत विद्यार्थी- पालक यांनी दर्जेदार माहितीपूर्ण रंजक अशी प्रात्यक्षिके सादर केली.
२१ व्या शतकाला ' ए आय' हे एक देणगी स्वरूपातच आहे. आपली बुद्धी अधिक तल्लख बनविण्यासाठी याचा वापर केला गेला तर भविष्यात निश्चितच नवनवीन आणि हटके उपकरणे तयार होतीलआणि माणसाचे जीवन अधिक सहज करण्यास त्याचा उपयोग होईल असा विश्वास डॉ. सौ छाया आसाराम भालसिंग यांनी व्यक्त केला.
वंडर किड्स प्री स्कूल मध्ये सायन्स डे निमित्त मुलांनी सादर केलेल्या अभ्यासपूर्ण प्रात्यक्षीकामधून ' विज्ञान ' हा मानवी जीवनाचा कसा अविभाज्य भाग आहे हे प्रकर्षाने दिसते आहे असे त्या म्हणाल्या. त्यांच्या हस्ते फित कापून या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी श्रीमती आशा जाधव, डॉ. सुजाता तुवर, वंडर किड्स च्या संचालिका वैशाली जाधव, मुख्याध्यापिका मोनिका दारव्हेकर अविनाश क्लासेस संचालक प्रा. अविनाश जाधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की दिनांक २८ फेब्रुवारी हा दिवस जिज्ञासू वृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी, नवनिर्मितीत गर्क असलेल्या अभ्यासकांसाठी आणि सत्याचा शोध घेणाऱ्या शोधकांसाठी एक उत्सवाचा दिवस आहे, हा दिवस आपण जे भारत रत्न आणि नोबल पुरस्कार विजेते थोर भौतिक शास्त्रज्ञ डॉ. सर सी वेंकट रमण यांच्या रमण इफेक्ट शोधाला समर्पित करतो. त्यांनी जो शोध लावला तो विलक्षण आहे . कारण पाण्याला निळा रंग हा आकाशाचे समुद्रात पडलेल्या निळा प्रतिंबिंबा मुळे नाही तर पाण्यात सूर्यकिरण विखुरल्यामुळे प्राप्त होतो. हा शोध त्यांनी लावला आणि त्यांना नोबल मिळाले. त्यांच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय विज्ञानदिन आहे.
आणि वंडर किड्स स्कुल मध्ये बाल वयातच मुलामध्ये विज्ञान विशयाची रंजकता यावी त्यांना विज्ञानाची गोडी लावावी यासाठी हे उपक्रम दरवर्षी आम्ही राबवतो. सायन्स डे चे वंडर किड्स चे दुसरे वर्ष आहे. आणि पालकांनी इंटरनेट तसेच ए आय टूल्स चा वापर अतिशय कुशाग्र पणे केला हे या प्रात्यक्षिकातून दिसले .
या प्रदर्शनात मुलांना, सोलर सिस्टीम, आपली ज्ञानेंद्रिये, मानवी अवयव, आपली तीर्थस्थळे, खेळ, विज्ञान असे विषय देण्यात आले होते. आणि मुलांनी टाकाऊ तुन टिकाऊ प्रात्यक्षिक प्रदर्शनात मांडावे असे सांगितले होते. विद्यार्थी आणि पालकांनी याचे तंतोतंत पालन करून ही वैविध्यपूर्ण वस्तू सामुग्री तयार केली. ज्याचे शिक्षक पालक आणि प्रदर्शनाला भेटी देणाऱ्या मान्यवरांनी विशेष कौतुक केले. या सायन्स डे यशस्वी करण्यासाठी वंडर किड्सच्या शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com