सह्याद्री वाहिनीवर 25 व 26 एप्रिल रोजी आहार तज्ञ डॉ.माधुरी ठोंबरे यांची मुलाखत
अहमदनगर (प्रतिनिधी ) - गुलमोहोर रोड येथील साईराम न्युट्रीकेअरच्या संचालिका आहारतज्ञ डॉ.माधुरी ठोंबरे यांची सह्याद्री वाहिनीवर सखी सह्याद्री कार्यक्रमात दि.25 रोजी दु. 12 वा. व पुन:प्रक्षेपण रात्री 11 वा. तसेच दि.26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वा. मुलाखत होणार आहे.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील प्रक्षेपित होणार्या मुलाखतीमध्ये डॉ.माधुरी ठोंबरे या महिलांना मानसिक, शारीरिक व वाढत्या ताणतणावात आहार कसा घ्यावा, पोषक आहाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दूरदर्शनच्या सूत्रसंचालिका चैताली कानिटकर यांच्या सोबत थेट मुलाखत प्रेक्षेपण केले जाणार आहे.
तरी या मुलाखतीच्या श्रवणाचा लाभ घेऊन महिलांनी आपल्या समस्या फोनवर सांगाव्यात, त्याचे निाराकण करण्यात येईल, असे डॉ.माधुरी ठोंबरे यांनी सांगितले.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com