वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेस 2 कोटी 83 लाखांचा नफा : सभासदांना 10% लाभांशा वाटणार
अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर वीज तांत्रिक कामगार पतसंस्थेला 2023-24 या आर्थिक वर्षात 2 कोटी 83 लाख रुपये ढोबळ नफा झाला आहे. त्यातुन आवश्यक तरतुदी वजा करुन संस्थेला 1 कोटी 11 लाख निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संतोष शेलार व व्हाईस चेअरमन आशिष वेळापुरे यांनी दिली. यावर्षी सभासदांना 10% लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी तज्ञ संचालक प्रविण जठार, सचिव रुपेश चाकणे, संचालक बाळासाहेब जावळे, सतिष भुजबळ, संतोष भिंगारदिवे, सचिन चोरगे, किशोर काळे, कुशाबा वायसे, अरुण भोसले, सचिन सुडके, अरविंद पाठक, प्रविण देशमुख, सोमनाथ शिरसाठ, अशोक मते, श्रीमती सुनिता मेढे, उषा मिसाळ,व्यवस्थापक दिलीप घोडेचोर, बळीराम गायकवाड, दिपक हुशारे आदिंसह कर्मचारी उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभा 16 जून 2024 रोजी लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालय, टिळक रोड, अहमदनगर येथे आयोजित केली आहे.
अधिक माहिती देतांना संतोष शेलार यांनी सांगितले, संस्थेमार्फत सभासदांना 18 लाख साधे कर्ज, 3 लाख शैक्षणिक, 50 हजार तातडी कर्ज मंजुर केले जाते. सभासदांच्या मुदत ठेवीवर 9% वार्षिक व्याज दर दिलेला आहे. संस्थेचे मार्गदर्शक सतीष भुजबळ व शंकर जारकड यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी तांत्रिक पॅनलने संस्थेचा कारभार हाती घेतल्यापासून खर्चात काटकसर करत कारभार करत आहेत.
मार्च 2024 अखेर संस्थेची सभासद संख्या 777 असून संस्थेचे वसुली भागभांडवल 7 कोटी रूपये, फंडस 3 कोटी रु., सभासद ठेवी 12 कोटी रु. असून सभासदांना कर्जवाटप 20 कोटी रुपये केले असून अहवाल सालात सभासद कल्याण निधीतुन वीज तांत्रिक कामगारांना कन्यादान योजना, आहेर योजना, स्री जन्माचे स्वागत योजने अंतर्गत सभासदांना एकरकमी देण्यात आले आहेत.
तसेच नव्याने संस्थेतर्फे प्रत्येक सभासदांना वैयक्तीक अपघात विम्याद्वारे 20 लाख रुपयांचा अपघाती विमा घेण्यात आलेला आहे, तसेच बिगर कर्जदार सभासद नैसर्गिकरीत्या मयत झाल्यास वारसांना 1 लाखाची मदत देण्यात येत आहे. तसेच उर्वरीत शेअर्स व कर्जखाते वर्ग करुन 5 लाखापर्यत कर्जमाफी देण्यात येत आहे. सभासदांची अपघात विमा पॉलीसी
सभासदांसाठी वार्षिक 20 लाखाची विमा पॉलीसी काढण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत अपघात विम्यामधून सभासदाच्या वारसास मदत देण्यात येणार आहे. मागिल वर्षाप्रमाणे सभासदांचे लाभांश रक्कम दुसर्या दिवशी सभासदाच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याचे व्हाईस चेअरमन आशिष वेळापुरे यांनी सांगितले.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com