राधिका भरतनाट्यम् अॅकेडमीचा 100% निकाल
अहमदनगर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये आदर्शनगर, कल्याण रोड परिसरातील राधिका भरतनाट्यम नृत्य अकादमीचा 100 टक्के निकाल लागला. या परिक्षेत गौरी तिकोने (विशारद प्रथम), सिद्धी गांधी, तुलसी ओस्तवाल, कृष्णा लगड (विशारद पूर्ण) परिक्षेत यश संपादन केले. त्यांना संचालिका सौ.कविता भांबरे- घोलप यांचे मार्गदर्शन लाभले.
यासर्व विद्यार्थिनींनी जवळपास दहा वर्ष अथक परिश्रमानंतर विशारद पदवीचे यश प्राप्त झाले. या सर्व विद्यार्थ्याना भरतनाट्यम परीक्षे करीता केंद्र प्रमुख देऊळगावकर, गायना करीता आदेश चव्हाण, मृदंग वादक उत्कर्ष दळवी, सहाय्यक आश्लेषा पोतदार, विशेष सहाय्य पृथ्वी सुपेकर आणि मंदार फुलारी यांचे मार्गदर्शन लाभले.
कल्याण रोड, आदर्शनगर येथील पारुनाथ ढोकळे, प्राचार्य खासेराव शितोळे, प्रकाश लगड, संतोषराव दसासे, अॅड.सुधीर शेटे, विजय गाडळकर, भगवान काटे, राजेंद्र पवार, परशुराम कोतकर यांनी अभिनंदन करुन लवकरच सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com