Ahmednagar Corporation: लाचलुचपत विभागाची धाड ; अहमदनगर मनपा आयुक्त जावळे फरार
अहमदनगर :
अहमदनगर मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे हे एका बांधकाम फर्मला बांधकाम परवाना देण्यासाठी ८ लाखाची लाच मागितली होती यावरून त्यांच्यावर ट्रॅप लावण्यात आल्याची कुणकुण त्यांना लागली आणि अहमदनगर मनपाचे आयुक्त सध्या फरार झाले आहेत.
लाचलुचपत विभागाने सध्या कारवाई करत आयुक्त पंकज जावळे यांचे घर सील करण्यात आले. संभाजी नगर लाचलुचपत यांच्या मार्फत हि कारवाई करण्यात आली.
लाच लुचपत विभागाने पोलिसात तक्रार दाखल करण्यास सुरवात केली आहे आयुक्त पंकज जावळे हे त्यांचे स्वीय सहायक शेखर देशपांडे यांच्या हस्ते हि लाच स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु हि लाच स्वीकारण्या आधीच हे दोघे फरार झाले असल्याची माहिती एसीबी ने दिली आहे.
व्हिडीओ सौजन्य साभार ABP माझा

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com