दक्षिण आफ्रिकेत मॅरेथॉन बॅक टू बॅक स्पर्धेत अहमदनगरचा डंका
अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्हा हा आता सर्वच क्षेत्रात नावा रुपाला येत आहे. आध्यात्मिक वारसा लाभलेला हा जिल्हा कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राची ओळख करुन देणारा ठरत आहे. स्पर्धेच्या युगात अहमदनगरचे नाव देश पातळीवर झळकले. अहमदनगरच्या धावपटूंनी इतिहास घडवित सलग दुसर्यांदा मॅरेथॉन बॅक टू बॅक मेडल मिळवून अहमदनगर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
दक्षिण आफ्रिकेत अहमदनगरच्या नावाचा डंका वाजविला ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार आ.संग्राम जगताप यांनी काढले.
अहमदनगर रनर्स क्लबचे सदस्य जगदीप मकर, गौतम जायभाय, योगेश खरपुडे यांनी दक्षिण ऑफ्रिकेत सलग दुसर्या वर्षी सहभाग घेऊन मॅरेथॉन बॅक टू बॅक मेडल मिळविल्याबद्दल आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमृत पितळे, विकास भोजने, वैभव वाघ, विजय फुलसौंदर, विशाल मदने, अहमदनगर रनर्स क्लबचे सदस्य, सायकलिंग क्लबचे सदस्य रवी पात्रे उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले, अहमदनगरचे नाव जागतिक पातळीवर उंचाविण्याचे काम हे धावपटू करतात, मात्र यामागे त्यांची किती मेहनत असते. किती सराव त्यांना करावा लागतो, याचा अनुभव धावपटूंच्या मनोगतामधून दिसून आले. डर्बन सारख्या शहरात ही मॅरेथॉन झाली.
धावपटूंच्या शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस लागतो, तेव्हा हे यश मिळते. या सर्व धावपटूंचे सर्व शहरवासियांच्या वतीने मी कौतुक करतो, अभिनंदन करतो व पुढील कार्यास शुभेच्छा देतो, असे आ.जगताप म्हणाले.
प्रास्तविकात योगेश खरपुडे यांनी गेल्या 6 महिन्यांपासून कशी तयारी केली द आफ्रिकेत मॅरेथॉन पूर्ण करतांना काय अनुभव आला, याची माहिती दिली. अहमदनगर रनर्स क्लब, अहमदनगर सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांसह गौरव फिरोदिया यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com