मोफत योग व आरोग्य साधना सप्ताह पुष्प तिसरे मध्ये प्रतिपादन
अहमदनगर (प्रतिनिधी) -निसर्गामध्ये सर्व रोगांचा इलाज आहे म्हणून मिट्टी पाणी और हवा इस दुनिया मे सबसे बडी दवा असे म्हटले जाते आपण पाहिलं तर निसर्गातच सर्व काही औषधी गुणधर्म आहेत फक्त आपण त्याकडे पहात नाही म्हणून आम्ही निसर्गोपचार घ्या असे सांगतो असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ञ डॉ हेमा सेलोत यांनी केले
प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर मित्र मंडळ व नक्षत्र प्राणायाम परिवारच्या वतीने बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन येथे रोगानुसार योगा हे पाच दिवसीय मोफत योग व आरोग्य साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्याचे तिसरे पुष्प आहार व पंचभौतिक उपचार यावर व्याख्यानात ते बोलत होते तत्पूर्वी सौ ठोकळ यांनी योग विषयक मार्गदर्शन केले. यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर,अविनाश ठोकळ, रघुनाथ केदार प्रकाश इवळे, मधुकर निकम,अशोक बाबर आदी सह मोठ्या संख्नेने नगरकर उपस्थित होते.
डॉ सेलोत पुढे म्हणाल्या काही आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आजार होऊ नये व त्यांच्याकडे जाऊच नये असे आपण वाटत असेल तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे वागले पाहिजे , सकाळी सर्योदयाच्या बरोबर उठावे व सूर्यास्ताबरोबर थांबावे. आपली झोप पूर्ण झाली पाहिजे,पाणी माठातले किंवा तांब्यातले पाणी पिले पाहिजे त्यामध्ये जिरे ,धने, ओवा ,बडीशेप पाण्यामध्ये भिजून घ्यावे व ते प्यावे निसर्गोपचार करताना औषधे नाही तर आहार हेच तुमचे औषधे आहेत, सर्व घटक देवाने दिले आहे देवाने शरीरात डॉक्टर ठेवला आहे उपवास केल्याने शरीराला विश्रांती मिळते अवयवांना विश्रांती मिळते म्हणून आपण आठवड्यातून एक दिवस उपवास करा ,सिजनेबल फळे खा, कृत्रिम पेये बंद करा ,लिंबाचा रस घ्या ,खारीक खा, शेवग्याच्या शेंगा पाला खा ,जेवताना चावून खाणे, न बोलता खाणे त्यामुळे उदरभरण नीट होते.
सकाळी सूर्यप्रकाश घ्या शहरापासून लांब फिरायला जा व तेथील स्वच्छ हवा घ्या हे सर्व आपणास फुकट मिळते पण आपण ते घेत नाही ,जेवणानंतर काहीही खाऊ नये ,चिडचिड केल्याने आपले आरोग्य बिघडते आजाराला घाबरू नका देवाने दर्द दिला आहे तर दवा पण दिलेली आहे हे लक्षात ठेवावे आपण जगण्यासाठी खायचे का ? खाण्यासाठी जगायचे हे ठरवले पाहिजे सकाळी लवकर उठल्याने व प्राणायाम केल्याने आपल्या शरीर स्वच्छ होते असेही त्या म्हणल्या. यावेळी उपस्थितीतांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले त्याचे त्यानी समाधानकारक उत्तरे दिली
.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com