शासनाच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला जातो
-प्राचार्य ज्ञानदेव बेरड
अहमदनगर (प्रतिनिधी) - केडगांव येथील भाग्योदय विद्यालयात पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देत नवगतांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक रघुनाथ लोंढे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, रेणुकामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे, सौ.मानेताई, ढाकणे ताई आदि उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले, विद्यार्थ्यांना मिळणार्या शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी विद्यालयात केली जाते. मोफत पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती, इबीसी सवलत आदि योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला जातो. तसेच शालेय व सहशालेय उपक्रमांतून विद्यार्थ्यांची प्रगती साधली जाते. इ.10 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्गांचे आयोजन केले जात असल्याने विद्यालयाचा निकाल उंचावत आहे. यंदाच्या वर्षीही विविध उपक्रमांचे नियोजन केले असल्याचे सांगितले.
यावेळी रघुनाथ लोंढे यांनी नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा पुरविण्यात येत आहेत. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यालयाचा 10 वी व 12 वी चा 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
प्रास्तविक बन्सी नरवडे यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे उद्देश सांगितला. सूत्रसंचालन दत्तात्रय पांडूळे यांनी केले तर आभार संतोष काकडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबासाहेब कोतकर, साहेबराव कार्ले, सोपान तोडमल, धनंजय बारगळ, सौ.रुपाली शिंदे, सौ.रेणुका गुंड, आदिनाथ ठुबे, गोविंद कदम, गोरक्ष कांडेकर, एकनाथ होले, कर्मचारी गणेश गायकवाड, बाळासाहेब कावरे, सुधाकर गायकवाड आदिंनी परिश्रम धेतले.
यावेळी इ.10 वी व 12 वी बोर्ड परिक्षेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com