न्यु आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागातील 50 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये नामांकित कंपनीत निवड
अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) मधील रसायनशास्त्र विभागातील पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांकरीता कॅम्पस इंटरव्ह्युचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 50 विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्युद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची उत्तम संधी मिळाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध करुन देणारे पहिले महाविद्यालय ठरले आहे.
या कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये सन फार्मा प्रा.लि. अहमदनगर, अराजेन लाईफ सायन्स प्रा.लि.हैदराबाद व बंगोलर, ओ.टू एच. डिस्कव्हरी प्रा.लि.अहमदाबाद (गुजराथ), कॅलेक्स प्रा.लि.मुंबई, क्लिनकेम प्रा.लि. मुंबई या बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या. सन फार्मा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास न्यालपिल्ली, नरन प्रसाद, विजयकुमार रोटे, ओ.टू एच. डिस्कव्हर प्रा.लि.चे वरिष्ठ अधिकारी विनोद भोगे, शिवरामकृष्ण बाबरीया, मेश्वा त्रिपाठी, कॅलेक्स प्रा.लि.आणि क्लिनकेम प्रा.लि.चे डॉ.के.व्ही.वराळ व डॉ.अनिल गावडे उपस्थित होते.
यामध्ये सन फार्मामध्ये 28, अराजेन लाईफ सायन्समध्ये 7, ओ टू एच डिस्कव्हर मध्ये 8, कॅलेक्स व क्लिनकेम मध्ये 7 विद्यार्थ्यांची निवड झाली.
या कॅम्पस इंटरव्ह्युचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे यांच्या संकल्पनेतून तसेच विज्ञान शाखेचे उपप्राचार्य व विभागप्रमुख डॉ.डी.आर.ठुबे यांच्या प्रयत्नातून करण्यात आले होते. त्याचप्रमाणे विविध सांमजस्य करार, शैक्षणिक संबंध प्रस्थापित करुन महाविद्यालयामध्ये मुलाखती व रोजगाराच्या विविध संधीबाबत व्याख्यानांचे आयोजन करत कॅम्पस इंटरव्ह्युचे आयोजन व नियोजन विभागातील सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीने केले जाते.
या कॅम्पस इंटरव्ह्युचे आयोजनासाठी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.बी.बी.सागडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.एस.बी.कळमकर, प्रबंधक बी.के.साबळे, कार्यालयीन अधिक्षिका श्रीमती हेमा कदम व आर.एन.पाटील यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ.विवेकजी भापकर, सचिव अॅड.विश्वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार अॅड.दीपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त मंडळ व महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य बी.बी.सागडे यांनी विद्यार्थी व शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले.
या कॅम्पस इंटरव्ह्युसाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यापुढेही रसासनशास्त्र विभाग सातत्याने विद्यार्थी हिताची जोपासना होण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवित असल्याचे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ.डी.आर.ठुबे यांनी केले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com