Nilesh Lanke: गुंड गजा मारणे याची झालेली भेट ही घटना अपघाताने घडली मात्र चुकीची : खासदार निलेश लंके
अहमदनगर (प्रतिनिधी) : त्या व्यक्तीची पार्श्वभूमी मला नंतर समजली आणि त्याच्याशी झालेली भेट ही घटना अपघाताने घडली मात्र चुकीची नवनिर्वाचित शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे खासदार निलेश लंके यांनी पुण्यात शुक्रवारी रात्री गुंड गजा मारणे सोबत घेतलेली भेट आणि सत्कार चांगलेच वादग्रस्त झाले.
अहमदनगर जिल्ह्यात तसेच पुणे आणि मुंबई शहर परिसरात राजकीय क्षेत्रात सत्ताधारी आणि विरोधकात गुंड गजा मारणे याने केलेला खासदार निलेश लंके यांचा सत्कार समाज माध्यमांवर चांगलाच वायरल झाला.
झालेल्या प्रकरणाची खासदार निलेश लंके यांनी करत याबाबत खुलासा करताना म्हटले की गुंड गजा मारणे याची भेट अपघाताने झाली आहे हा महाशय कोण आहे हे मला आधी माहित नव्हते या व्यक्तीची पार्श्वभूमी मला नंतर समजली झालेली भेट अपघाताने झाली विविध ठिकाणी आणि विविध शहरात लोकप्रतिनिधींना जेव्हा पण जावे लागते प्रवास करावे लागते त्यावेळी अनेक लोक भेटीगाठी घेत असतात.
फोटो घेण्याची विनंती करत असतात सेल्फी घेत असतात त्याच पद्धतीने पुण्यात मला मारणे याने गाडीला हात करून थांबविले आमच्यासोबत चहा घ्या म्हणून विनंती केली त्यामुळे मी तिथे गेलो असता तिथे माझा सत्कार करण्यात आला.
त्या व्यक्तीची पार्श्वभूमी मला नंतर होऊन समजले झालेली माझी आणि गुंड मारनेची भेट ही अपघातानेच झाली परंतु माझी चूकच झाली असेही माध्यमांशी बोलताना खासदार लंके यांनी स्पष्टीकरण दिले आहे

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com