सीताराम सारडा विद्यालयात फुगे, रांगोळी, चमकीचे तोरण आणि सुमधुर बँडच्या तालात गुलाबपुष्पांचा वर्षावात विद्यार्थ्यांचे स्वागत
यशस्वी विद्यार्थी घडविणारी शाळा म्हणजेच सीताराम सारडा विद्यालय
- इंजि. विष्णुपंत तवले
अहमदनगर (प्रतिनिधी) - विद्यालयाच्या मुख्य द्वारापासूनच फुलांच्या माळा, फुगे, रांगोळी, चमकीचे तोरण आणि सुमधुर बँड च्या तालात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मोठ्या वर्गातील विद्यार्थिनींनी नवीन येणार्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून फुलांचा वर्षाव करत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील आनंद आश्चर्य आणि नाविन्यपूर्ण वातावरणाचा अनुभव खूप काही सांगत होता. मिळालेली पुस्तके शैक्षणिक साहित्य आणि गुलाब पुष्प यामुळे चेहरे अधिक खुलले होते. नवीन येणार्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थी शिक्षक - शिक्षकेतर आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प, मोफत शालेय पुस्तके व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा बांधकाम व्यवसायिक विष्णुपंत तवले, शाळेचे चेअरमन प्रा.मकरंद खेर, सीए अंकुश मेहेर, प्राथमिक शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा शालेय समिती सदस्य ईश्वर बोरा, मुख्याध्यापक विठ्ठल ढगे आदि उपस्थित होते.
यावेळी विष्णूपंत तवले म्हणाले, शाळा समाजातील विविध क्षेत्रात यशस्वी विद्यार्थी घडविणारी असून माझ्या यशामध्ये शाळेचा सिंहाचा वाटा आहे. शैक्षणिक ज्ञानासोबत व्यवहारीक ज्ञान येथे मिळत असते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा चेअरमन प्रा. मकरंद खेर यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देतानाच आपली शाळा यावर्षी विविध विद्यार्थी उपयुक्त उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. केशर बागचे संचालक तथा सीए अंकुश मेहेर यांनी विद्यार्थ्यांना लेखन साहित्य देऊन नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक विठ्ठल ढगे यांनी सर्वांचे स्वागत करून येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाबरोबर विविध शैक्षणिक सामाजिक व व्यावसायिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. पर्यवेक्षक किशोर खुरंगे यांनी मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक डोळसे, अनुपम शिंदे, रवींद्र चोभे, विलास घायाळ, सुनील कुलकर्णी , वृषाली जोशी, सुजाता खामकर, दीपक आरडे, अमोल कदम, सौ शीतल शिंदे, सौ नीलिमा राहींज, आनंद जोशी, दीपक शिरसाठ, ज्येष्ठ लिपिक गोवर्धन पांडुळे यांच्यासह सर्व शिक्षक - शिक्षिकेतर यांनी मोलाची मदत केली.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com