मराठी साहित्य टिकवणे ही काळाची गरज आहे - जयश्री काळे
अहमदनगर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची भुमी ही जशी थोर साधू-संतांची भुमी म्हणून ओळखली जाते. तशीच ती थोर लेखक-कवी यांच्या साहित्याने समृद्ध झालेली आहे. त्यामुळे संतांचे वाङमय आणि मराठी साहित्य यांचे जतन करणे ते टिकवणे हीआज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सौ.जयश्री काळे यांनी केले.
सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ‘विं.दा.दर्शन’ या थोर कवी लेखक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.दा.करंदीकर यांच्या कन्या सौ.जयश्री काळे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांच्या अनेक कविता जयश्री काळे यांनी म्हणून दाखविल्या. यामध्ये असा मी.. असा मी.. कसा मी... तसेच स्व:ताहाचा घरी मी दूरचा पाहुणा, बाल कवितेमध्ये स्वप्नात पहिली मी राणीची बाग.., लहान होऊनी कुशीत यावे... या शिवाय प्रेम कविता व शेवटी कवितेच्या माध्यमातून स्त्रियांना दिलेली मानवंदना सादर करण्यात आली. यानंतर विं.दा.ची निवडणुकीवरील प्रसिद्ध कविता ‘ कुणी कच्चे.. कुणी पक्के... सब घोडे बारा टक्के...’ ही कविता सर्वांची दाद मिळवून गेली. कवितांचा विंं.दा. यांच्या व्यक्तीमत्वाचे पैले उलगडून सांगितले.
यावेळी मंचाचे अध्यक्ष आदिनाथ जोशी, शरद कुलकर्णी, मोरेश्वर मुळे,विश्वास काळे, बलभीम पांडव,सर्वोत्तम क्षीरसागर, एस.एन.कुलकर्णी, पुष्पा चितांबर, माधवी कुलकर्णी खणकर सर, ज्योती केसकर, चारुशिला करवंदे, श्रीकृष्ण ब्रम्हे आदि उपस्थित होते.
यावेळी मंचच्या सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. आदिनाथ जोशी यांनी मंचचा कार्याविषयी माहिती सांगितले. पाहुण्यांचा परिचय ज्योती केसकर यांनी करुन दिला. सूत्रसंचालन पुष्पा चितांबर यांनी केले. शेवटी सुरेश कुलकर्णी मानले.
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com