Ahmednagar Sports: आठरे पाटील पब्लिक स्कूल आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य

Ahmednagar Sports: आठरे पाटील स्कूल आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य






     अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील वाडिया पार्क मैदानावर घेण्यात आलेल्या आंतरशालेय सुव्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या 15 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात आयकॉन पब्लिक स्कूलच्या संघाला 2 वि. 0 गोलनी पराजीत करुन अजिंक्यपद पटकाविले. या विजयात संघातील खेळाडू चंद भानुदास,चंद अशोक यांनी सिंहाचा वाटा उचलला.




          याच मैदानावर दिनांक 23 ते 24 जुलै, 2024 या कालावधीत घेण्यात आलेल्या आंतरशालेय 17 वर्षा खालील मुलींचा फूटबॉल संघ उपविजेता ठरला.या कालावधीतच 17 वर्षा खालील मुलांच्या फूटबॉल संघाने तृतीय क्रमांक पटकावला.आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी आपल्या अप्रतिम क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.अजिंक्यपद पटकाविलेलया 15 वर्षाखालील मुलांच्या संघाची पुणे विभागीय फूटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली.




      या सर्व विजयी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे पाटील,कार्यकारी विश्वस्त अॅड. विश्वासराव आठरे पाटील व सर्व विश्वस्तमुख्याध्यापकप्राथमिकच्या विभाग प्रमुखसमन्वयकपर्यवेक्षिकासर्व शिक्षकवृंदशिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.फूटबॉलच्या तिन्ही संघास क्रीडा शिक्षक श्री. दरंदले संदीप यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.