आंदोलनाचा इशारा देतात रस्त्याचे काम सुरू,शारदा ढवण यांनी मानले आयुक्तांचे आभार
अहमदनगर (प्रतिनिधी) - प्रभाग क्र.१मधील गावडे मळा येथील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्या रस्त्याचे काम लवकर चालू करावा अशी मागणी मा. नगरसेविका शारदाताई दिगंबर ढवण व नागरिकांनी गेल्या १५ दिवसापूर्वी अहमदनगर महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती, त्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य सूचना देऊन काम सुरू करण्यास सांगितले.व कामास आजपासून सुरुवात झाली, त्याबद्दल शारदाताई दिगंबर ढवण व नागरिकांनी आयुक्त साहेब यांचे खूप आभार मानले आहे.
आज पासून रस्त्याचे काम सुरू झाले. या रस्त्याची कामाची पाहणी माजी नगरसेविका शारदाताईढवण यांनी केली व त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच रस्ता पूर्ण होईपर्यंत त्या स्वतः व स्थानिक रहिवाशांना त्याकडे लक्ष देऊन काम चांगले करून घ्यावे,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अनिल ढवण,एड विजय अत्रे, संतोष गावडे,प्रवीण गवळी ,रोहन ढवण , वागस्कर साहेब, ठूबे साहेब, गवळी ताई ,अत्रे मॅडम व परिसरातील व कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते शारदाताई ढवण यांच्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com