खेळाडूंनी सहा सुवर्ण पदक तीन रौप्य पदक व पाच कास्यपदके जिंकली

Ahmednagar Sports: इंदापूर पुणे येथे राज्य कुराश स्पर्धेत यंग मेन्स ज्युडो क्लब,सिद्धीबागचे उत्तुंग यश



अहमदनगर (प्रतिनिधी)

  दिनांक 27 व 28 जुलै रोजी इंदापूर पुणे येथे झालेल्या सब ज्युनिअर राज्य कुराश अजिंक्यपद स्पर्धेत अहमदनगर जिल्हा कुराश असोसिएशनच्या खेळाडूंनी सहा सुवर्ण तीन रौप्य व पाच कास्यपदके जिंकत विजेतेपद मिळवले. 

    या स्पर्धेत दहा वर्षाखालील 25 किलो वजन गटात पार्थ दातरंगे याने सुवर्णपदक जिंकले तर श्लोक सब्बन याने कांस्यपदक जिंकले, 30 किलोच्या वरील गटात सम्राट करंजुले याने आरामात सुवर्णपदका वर आपले नाव कोरले.  बारा वर्षाखालील वयोगटात ब्रिजेश उर्फ कान्हा  मुनगेल याने 30 किलो वजन गटात सुवर्णपदक तर अनुज बोगा याने रौप्य पदक जिंकले. 35 किलो खालील वजन गटात विराट करंजुले याने सुवर्णपदक जिंकले. ५० किलो वरील गटात ओम पोकळे याने सुवर्णपदक जिंकले. तर मुलींच्या 36 किलो खालील गटात गार्गी मुळे हिने कांस्यपदक जिंकले.

     14 वर्षाखालील गटात ऋचा बोगा हिने 44 किलो खालील गटात सुवर्णपदक, 48 किलो वजनी गटात अबोली बेरड हे रौप्य पदक जिंकले, तर 52 किलो खालील गटात सिद्धी दातरंगे हिने कास्य तर श्रुती गव्हाणे हिने 52 किलो वरील गटात रौप्य पदक जिंकले. मुलांच्या 35 किलो खालील वजन गटात वेदांत आठरे व युवराज चौधरी यांनी कास्यपदक जिंकले.

      वरील सर्व यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय किर्तीचे मार्गदर्शक श्री संजय धोपावकर आणि (आंतररष्ट्रीय खेळाडू )आदित्य संजय धोपावकर कनिष्ठ मार्गदर्शक श्री शुभम दातरंगे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

       संघ व्यवस्थापक म्हणून आर्यन आगरकर व स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून सोनाली साबळे आणि अथर्व नरसाळे यांनी काम पाहिले. सर्व विजेत्या खेळाडूंचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी तर कुराश -अध्यक्ष हे सचिन जाधव यांनी विशेष अभिनंदन केले.