आ तनपुरे यांच्या प्रयत्नातून मांजरसुंभा गड रस्ता साठी रु १० लाख मंजूर-डॉ.मधु कदम 





          अहमदनगर (प्रतिनिधी)-   ऐतिहासिक असलेल्या व मोठ्या संख्नेने पर्यटक येत असलेल्या  मांजरसुंबा गड येथील रस्ता कामा साठी १० आ प्राजक्त तनपुरे यांनी डोंगरी विकास कार्यक्रमातून जिल्हा नियोजन मधून १० लाख रु मंजूर केले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाच्या  महिला तालुकाध्यक्ष डॉ. मधु कदम यांनी दिली 


         वांबोरी रोडवर डोंगरगण समोर असलेल्या मांजरसुंभा येथील डोंगरावर हा गड किल्ला आहे,येथील ग्रामस्थ,राष्ट्रवादी   महिला तालुकाध्यक्ष डॉ.मधु  कदम यांनी  आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मांजरसुंबा गड,दावल मालिक बाबा दर्गा रस्त्याच्या कामासाठी निधी मिळणे बाबत मागणी केली होती.कारण मांजरसुंबा ता.नगर येथे दावल मालिक बाबाचा दर्गा  गावचे तसेच पंचकृषीतील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे,तसेच येथे रोज पर्यटक येत असतात

 परंतु अद्याप पर्यंत येथील डोंगरावर जाण्यास पाऊल वाट आहे. तसेच  ती ऐतिहासिक वास्तु असुन पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची आहे सदर ठिकाणी चार चाकी गाडी जाण्यास रस्ता केल्यास भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी अत्यंत चांगले काम होईल.तरी आपण या कामी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली होती त्यानुसार रु १० लाख मंजूर करण्यात आले आहे याबद्दल गावकर्यांनी आ तनपुरे यांचे आभार मानले आहे 

'मंझर ए सुभा' असं त्याचं मूळ नाव

       डोंगरगण आणि गोरक्षनाथगडाच्या मध्यभागी असलेल्या या एकाकी डोंगरावर सोळाव्या शतकात मांजरसुंभागड बांधण्यात आला. 'मंझर ए सुभा' असं त्याचं मूळ नाव.मुर्तुझा निजामशहाच्या काळात सलाबतखान दुसरा या वजिरानं टेहळणी आणि संदेशवहन यंत्रणेचा भाग म्हणून वांबोरी घाटाजवळ मांजरसुंभागडाची निर्मिती केली. 


डोंगराच्या एका बाजूला दरी, तर दोन बाजूंना खोल घळी आहे. त्यामुळे या गडाला नैसर्गिक संरक्षण प्राप्त झालं आहे. येथे पर्यटक व भाविका बरोबर ट्रेकिंग , पॅराग्लयडींग  साठी पण लोक येथे येतात,रस्ता चांगला झाल्यास येथे पर्यटक मोठ्या संख्नेने येतील व गावातील लोकांना रोजगार पण मिळेल असे डॉ मधू कदम  म्हणाल्या