BCCI: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय; भारतीय खेळाडूंसाठी ८.५ कोटींची मदत जाहीर

BCCI: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय; भारतीय खेळाडूंसाठी ८.५ कोटींची मदत जाहीर





BCCI pledges 8.5 crores Indian Olympic Association: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला ८.५ कोटींची मदत जाहीर केली, अशी माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली.


बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या महिन्याच्या अखेरीस पॅरिसमध्ये होणारे ऑलिंपिक यशस्वी करण्यासाठी आयओएला आर्थिक मदत जाहीर केली आहे. शाह यांनी आयओएला या मोहिमेसाठी ८.५ कोटी रुपयांचा निधी देण्याची पुष्टी केली. याआधी महाराष्ट्र सरकारने पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या खेळाडूंसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.

मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की,  भारतीय नियामक मंडळ २०२१४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या अविश्वसनीय खेळाडूंना पाठिंबा देईल. या मोहिमेसाठी आम्ही आयओएला ८.५ कोटी रुपयांची मदत जाहीर करत आहोत. आमच्या सर्व खेळाडूंना आम्ही शुभेच्छा देतो. जय हिंद!", जय शहा यांनी