गुलमोहोर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी) - सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रविवारी पहाटे 5 वा ‘श्रीं’ना रुद्राभिषेक करण्यात आला. श्री स्वामी समर्थ मुर्ती आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. सकाळी 9 वा. स्वामी याग संपन्न झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी 12 वा होमहवन करण्यात आले. या होमहवनसाठी यजमान सौ.विशाखा व श्री.ऋषीकेश ढगे, सौ.राजश्री व श्री.व्यकंटेश सुवर्णकार, सौ.प्रिती व श्री.राजेंद्र चौधरी आदिंनी या हवनात आहुती दिली. पौरोहित्य निखिल देवरे व रेखी गुरुजी यांनी केले.
श्री गुरुचरित्र सत्संग परिवाराचा सत्संग संपन्न झाला. अभंग, भक्तीगीते यांचा कार्यक्रम अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी सादर केला. त्याचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे भक्तांचा उत्साह वाढला होता. दुपारी महाआरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
श्री.स्थामी समर्थ यांचा नामजप करण्यात आला. भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत होते. सुमारे एक ते दीड कि.मी.पर्यंत दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या उत्सवासाठी सुनिल मानकर, संजय देशपांडे, नितीन भिसे, गिरीष धर्माधिकारी, पंकज गुजराथी, रमेश चौधरी, विजय तिमोणे, देवीदास म्हस्के, संदिप पाटील, जितेंद्र चत्तर, विनोद पोरे, विजय धामणे, किरण वाकडमाने, चंद्रकांत जाधव, डॉ.योगेश वाघमारे आदिंनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com