व्यापारी मंडळाकडून दिंडीचे स्वागत व वारकर्यांना महाप्रसाद
अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर मध्ये आलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निवृत्ती महाराज आषाडी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीला मार्केटयार्ड व्यापारी मित्र मंडळ च्या वतीने फराळ देण्यात आला व दिंडीचे पूजन करून स्वागत करण्यात आले गेली १२ वर्षे हा उपक्रम चालू आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमोल पोखरणा यांनी दिली.
मार्केटयार्ड मधील सर्व व्यापारी एकत्र येऊन वारकर्यांना आज एकादशी असल्याने फराळ देण्यात आला,त्याचा लाभ सुमारे १२ ते १५ हजार वारकर्यांनी घेतला. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत फराळ वाटप चालू होते,तर दिंडी मधील पालखीचे स्वागत फटाके ची आतषबाजी करून व पूजा करण्यात आली.
यावर्षी प्रशासनाने उत्तम सहकार्य केले तर अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी खुप चांगली व्यवस्था ठेवली त्यामुळे सर्व व्यपाऱ्यानी मनपाचे कौतुक केले मनपाने स्वच्छता कर्मचारी ठेऊन पडलेल्या पत्रावळी संकलन केले त्यामुळे कचरा दिसला नाही.
कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी किशोर पोखरणा,आनंद चोपडा,अमोल पोखरणा, प्रीतम गांधी,हिरालाल पोखरणा,कालूशेठ,अभय लुणिया,राजमल चंगेडिया,राजू गांधी ,नितीन शिंगवी,प्रवीण लोढा,श्री खेताराम व सर्व मार्केट परिसरातील सर्व व्यापाऱयांनी परिश्रम घेतले


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com