वसंत टेकडीला साईंची मिरवणूक संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) -मधील सावेडीतील वसंतटेकडी येथील संदेशनगर मधील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने द्वारकामाई साई मंदिराचा ११ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा निम्मित आयोजलेल्या साई उत्सवमध्ये गुलमोहररोड,पाईपलाइन व परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती,यामध्ये विविध वाद्य पथक सह रथातून साईंची मिरवणूक काढण्यात आली .
गुरुपौर्णिमेला १० वर्षांपूर्वी बाळकृष्ण केंद्रे महाराज व साईदास महाराजांच्या हस्ते तिची प्रतिष्ठपणा करण्यात आली संध्याकाळी ६ वा साईउत्सव भव्य शोभायात्रा श्री स्वामी समर्थ मठ, गुलमोहोर रोड येथून प्रारंभ होऊन जयहिंद चौक, शिलाविहार चौक, श्रीराम चौक, संत नामदेव चौक, नित्यसेवा कॉलनी,दसरे नगर, द्वारकामाई साई मंदिर येथे सांगता झाली
रस्त्यात विविध ठिकाणी भाविकांनी पूजा केली नंतर मंदिरात नगरसेवक सुनील त्र्यबंके महाआरती झाली यावेळी निखिल वारे, बाळासाहेब पवार,विनीत पाऊलबुद्धे ,बबलू सूर्यवंशी, माउली गायकवाड, अध्यक्ष योगेश पिंपळे, दीपक कुडिया, आकाश त्र्यंबके आदी भाविक मोठ्या संख्नेने उपस्थित होते शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com