सी.ए.फायनल परिक्षेत कु.श्वेताली मगर हीचे यश
अहमदनगर (प्रतिनिधी) - इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया यांच्यावतीने मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फायनल परिक्षेत कु.श्वेताली संजय मगर ही चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली. तिने सीए अमृत पटेल व सीए प्रसाद भंडारी यांच्याकडे आर्टिकलशिप पुर्ण केली.
कु.श्वेताली मगर हीचे इ.10वी पर्यंतचे शिक्षण श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत तर पदवीपर्यंतचे शिक्षण पेमराज सारडा कॉलेज येथे झाले आहे. नवलेनगर, गुलमोहोर रोड येथील रहिवासी
शिक्षक बँकेचे निवृत्त सिनी.अकौंटंट स्व.संजय मगर यांची ती कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कु.श्वेताली मगर हीने वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याची भावना आई सुवर्णा मगर यांनी व्यक्त केली.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com