Dr.Paulbudhe College: डॉ.पाऊलबुद्धे फार्मसी कॉलेजच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
अहमदनगर (प्रतिनिधी) - वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ.ना.ज. पाऊलबुद्धे कॉलेज ऑफ फार्मसीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. कॉलेजचा 95 टक्के निकाल लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
कॉलेजमध्ये अनुक्रमे प्रथम - प्राजक्ता पळसकर, द्वितीय - शितल जाधव, तृतीय - वैष्णवी बडे यांनी मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष विनय पाऊलबुद्धे,
सचिव रामकिसन देशमुख, विश्वस्त साई पाऊलबुद्धे, सदस्य श्रद्धा पाऊलबुद्धे, बीएड कॉलेजच्या प्राचार्य रेखाराणी खुराणा, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्याम पांगा, प्राचार्या अनुराधा चव्हाण, यांनी अभिनंदन केले.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com