दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विभागाची गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) - आपण प्रत्यक्ष देव पाहिला नाही, पण आपली पहिली गुरु हे ‘आई-वडिल’ आणि ज्ञान देणारे ‘शिक्षक’ यांच्यातच आपण देव पहावा. देवाच्याही आधी गुरुच्या चरणी विलिन व्हावे. गुरु हे सूर्याच्या प्रकाशासारखे प्रकाशमान असतात ते आपल्या ज्ञानरुपी प्रकाशकिरण आपल्या शिष्यांना देऊन अंधकारुयपी अज्ञान नाहीसे करतत. आपल्या शिष्याला जीवनातल्या यशस्वीतेचा मार्ग दाखवतो. दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करुन सक्षमपणे जीवन जगण्याची दिशा देत आहेत, असे प्रतिपादन वेदाचार्य महेश रेखे यांनी केले.
दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विभागातर्फे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी वेदाचार्य महेशजी रेखे हे होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई रेखे, सेक्रेटरी सुनिल रुणवाल, खजिनदार उमेश रेखे, कार्य.सदस्य किरण वैकर, प्राचार्य सुनिल पंडित, मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा धरम, सौ.अनुराधा जोशी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी विजयताई रेखे म्हणाल्या, गुरु एखाद्या पथदिव्याप्रमाणे आपल्या शिष्यांना अंधकाररुपी अज्ञानातून उचित मार्ग दाखवतात. मेहनत, जिद्द आणि चिकाटी हे गुण अंगी बाळगण्याची प्रेरणा गुरु देतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी गुरुंचा आदर करुन चांगला अभ्यास करुन आपली प्रगती साधावी.
यावेळी प्रास्तविकात विजय गरड यांनी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न बनविण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने प्रयत्न केले जात आहे. अभ्यासाबरोबर संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले जात असल्याचे सांगितले.
यावेळी सुनिल रुगवाल यांनी वेदाचार्य महेश रेखे यांचा परिचय करुन देतांना सांगितले की, महेशजी रेखे हे घनपाठी असून, नगर शहरात वेदशाळा चालवून ज्ञानदानाचे उत्तर कार्य करत आहेत. त्यांनी घडविलेले शिष्यही समाजात त्यांचा कर्तुत्वाचा ठसा उमटवित आहेत. त्याचबरोबर समाज कार्यही सुरु आहे.
आजच्या कार्याचे औचित्य साधून त्यांच्या पत्नी स्व.मधुरा रेखे यांच्या स्मरणार्थ संस्थेस 11 हजार रुपये देगणी दिली. यातूनच त्यांची शिक्षणाबद्दल असलेली आस्था दिसून येते त्यांच्या देणगीबद्दल संस्थेच्यावतीने आभार मानतो.
यावेळी कथाकथन स्पर्धेदद्वारे विद्यार्थ्यांनी गुरुंच्या प्रती आदर व्यक्त करुन शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com