ZP Arogya Dindi: जिल्हा परिषदेच्या वतीने दिंडीतील वारकर्यांना आरोग्य सुविधा
अहमदनगर (प्रतिनिधी) -अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने नगर जिल्ह्यातून जाणार्या सर्व दिंड्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या असून दिंडी मार्गावरील जेथे दिंडी मुक्कामाला किंवा जेवण्यास थांबते तेथे डॉक्टर व कर्मचारी स्टोल लावून हि सुविधा देत आहे तसेच जेथे आरोग्य केंद्र आहेत तेथील कर्मचारी दिंडी मार्गावर सेवेसाठी थांबतात अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नागरगोजे यांनी दिली
अहमदनगर (प्रतिनिधी): नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नगर तालुक्यातील तुक्कडओढा येथे वारकरी सेवा देण्यासाठी शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्र, रुईछत्तीसी आरोग्य केंद्र या केंद्रांतर्गत ठिकाणी वारकरी सेवा कॅम्प लावण्यात आले होते. त्याला त्यांनी भेट दिली व संत निवृत्तीनाथ पालखीचे पूजन केले.
यावेळी डॉ.खतेले ,वैद्यकीय अधिकारी, नाशिक, डॉ.आशिष टाक, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र. रुई छत्तीशी, डॉ.यादव सूर्यकांत, शिराढोण,सीएचओ, श्री वैभव चेन्नूर, श्रीम.मनीषा बनसोड, डॉ.शेजाल योगिता, सीएचओ वाळुंज, विनोद पाटील, डॉ.सौरभ शिंदे, सीएचओ वडगाव,
संदीप भालसिंग, ,संदीप फटांगरे, सचिन साळवे, श्री.संतोष भिंगारदिवे ,आशा ताई ,जयाताई दरेकर, सपाटे ताई, सुलक्षना झरेकर, रंजना बोडखे आदी डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
दिंडी याठिकाणी जेवणासाठी थांबली होती, या दिंडीतील वारकर्यांना गोळ्या, प्राथमिक उपचार आरोग्य विभागाची टीम ने केले .


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com