विविध उपक्रम राबवून भाजपा व्यापारी आघाडीने शहरात चांगले काम केले - प्रदेश महामंत्री रविन्द्र अनासपुरे
अहमदनगर (प्रतिनिधी) :
भारतीय जनता पक्ष, शहर जिल्हा व्यापारी आघाडीने पदाधिकारी निवडी नंतर गेल्या ४ महिन्यात शहरात चांगले काम केले आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश महामंत्री रविन्द्र अनासपुरे यांनी केले .
भाजपाच्या संपर्क से समर्थन अभियान अंतर्गत ते विविध ठिकाणी भेट देत आहेत,आज त्यांनी भारतीय जनता पक्ष, शहर जिल्हा व्यापारी आघाडीच्या सदस्यांची भेट घेतली,यावेळी व्यापारी आघाडी तर्फे सत्कार करण्यात आले यावेळी अॅड.अभय आगरकर,सरचिटणीस सचिन पारखी,पंडित वाघमारे,
प्रशांत मुथ्था,व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे,उपाध्यक्ष नीरज राठोड,रूपेश वर्मा,प्रशांत बोऱ्हाडे,हर्षल बोरा,सुरेश लालबागे,लक्ष्मीकात तिवारी,संजय कांगला आदींसह व्यापारी आघाडीचे सदस्य तसेच आडते बाजार व्यापारी असो चे संचालक भूषण भांडारी उपस्थित होते.
विभाग संघटनमंत्री तथा महाराष्ट्र भाजपा मुख्यालय प्रभारी असलेले रवी अनासपुरे पुढे म्हणाले व्यापारी आघाडीने गुणवंत तसेच निवड झालेल्याचा सत्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांच्या प्रेरणेने एक पेड माॅ के नाम या संकल्पनेला अनुसरून वृक्षारोपण,
योग दिवस,पोलीस चौकीची मागणी आदी उपक्रम राबवून चांगले काम केले आहे याबद्दल मीच तुमचा सत्कार करतो असे म्हणून त्यानी प्रातिनिधिक स्वरूपात अध्यक्ष महेश गुगळे यांचा सत्कार केला यावेळी विविध विषयांवर, विधानसभा, मनपा निवडणुकीवर चर्चा झाली

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com