Ahmednagar College: सेट परीक्षेत कु.भार्गवी बार्नबस यांचे यश
अहमदनगर (प्रतिनिधी) |
अहमदनगर महाविद्यालयाची माजी विद्यार्थींनी कु.भार्गवी रजनिश बार्नबस हि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता (सेट) परीक्षेत उत्तीर्ण झाली.
या यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. तिने हि परिक्षा प्रथम प्रयत्नातच यशस्वी केली. प्रख्यात शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस व डॉ.स्वाती बार्नबस यांची ती कन्या आहे.
ती अहमदनगर महाविद्यालयाची इंग्रजी विभातुन इव्हर्नसिटी टॉपर आहे. या यशाबद्दल तिचे महाविद्यातील सर्व प्राध्यापकांनी व विद्यार्थींनी अभिनंद केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com