जिल्हा न्यायालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अॅड. क्रांती बागुल यांना प्रथम क्रमांक
अहमदनगर (प्रतिनिधी) :
अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या द्विशतक पूर्ती कार्यक्रमानिमित्त अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.नरेश गुगळे व उपाध्यक्ष अॅड.महेश शेडाळे व अॅड.सचिव संदीप शेळके यांनी अहमदनगर जिल्हास्तरीय भारतीय संविधान कलम 51 अ- नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आजची परिस्थिती व त्यावरील उपाय या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या विषयावरील निबंध स्पर्धेत श्रीरामपूर वकील संघाच्या सदस्य अॅड. क्रांती अशोक बागुल-आरु यांना प्रथम क्रमांक मिळाला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती व जिल्ह्याच्या पालक न्यायाधीश विभा कंकणवाडी यांच्या हस्ते रक्कम रुपये दहा हजार व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले.
अहमदनगर येथे जिल्हा न्यायालयाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेत एकूण 40 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामधून अॅड.क्रांती बागुल यांना प्रथम, अॅड.उमेदीने कुलकर्णी यांना द्वितीय व अॅड.गौरी लोखंडे यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेस परीक्षक म्हणून माजी.जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.चंद्रचूड गोंगले यांची नेमणूक करण्यात आली होती.
यावेळी न्यायमूर्ती उर्मिला जोशी/ फलके, न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर, न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा माझी न्यायमूर्ती एस के शिंदे सुधाकर देशमुख, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप उपाध्यक्ष अॅड. उदय वारुंजीकर, सरकारी वकील सतीश पाटील व अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष इतर सभासद वकील वर्ग उपस्थित होते.
अॅड.क्रांती बागुल-आरू या श्रीरामपूर बार असोसिएशनच्या सदस्या असून सध्या अहमदनगर जिल्हा कोर्टात काम करीत आहेत. त्यांना माजी.शिक्षक व मुळा प्रवरा संचालक अशोक बागुल, उपसरपंच त्रिंबक आरू , व आर्किटेक प्रवीण आरू यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी अॅड.क्रांती बागुल-आरू यांचे अॅड. जबिन शेख, अॅड. अनिता दिघे, अॅड. भक्ती शिरसाठ, अॅड. धनलक्ष्मी नायडू, अॅड. रविंद्र हळनोर, अॅड. रफिक बेग, अॅड. रियाज बेग, अॅड. सरोदे, अॅड. करुणा शिंदे, अॅड.निर्मला चौधरी आदींनी अभिनंदन केले.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com