मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने पंचशील विद्यामंदीर शाळेत वही वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी ) |
येथील सिद्धार्थनगर मधील पंचशील विद्यामंदीर प्राथमिक शाळा मधील सर्व विध्यार्थ्यांना मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले,शाळा संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड,दलित आघाडी शिवसेना प्रमुख पोपटराव पाथरे ,जिल्हा शिवसेना उपप्रमुख आनंदराव शेळके, सिद्धार्थनगर शाखा अध्यक्ष पांडुरंग घोरपडे,कृष्णा काळे, साहेबराव काते,सुनील सकट आदींसह विद्यार्थी, शिक्षक उपस्तित होते,
कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे जयंती निम्मित त्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी बोलतांना बाबूशेठ टायरवाले म्हणाले एकीबाजूला शाळेला भरमसाठ डोनेशन तर दुसरीकडे मुलांना वह्या ड्रेस नाहीत हा विरोधाभास संपण्यासाठी सर्वाना समान शिक्षण मिळाले पाहिजे म्हणजे स्पर्धाचा युगात मोठयांची मुले पुढे जातात तर गरिबांची सुविधा अभावी जात नाही म्हणून गेली अनेक वर्षे समाजसेवा म्हणून मुलांच्या शिक्षणाला हातभार म्हणून गरजू मुलांना मातोश्री प्रतिष्ठानच्याच्या वतीने वह्या वाटप केले जाते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर उंडे यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com