डॉ.पाऊलबुधे विद्यालयात सखी सावित्री समितीचे गठन
अहमदनगर : दर्शक |
राज्यातील शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करणेबाबत शासन निर्णयानुसार वसंत टेकडी येथील डॉ. ना. ज. पाऊलबुधे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सभा घेण्यात आली.
या सभेचे अध्यक्षा प्राचार्या डॉ. रेखाराणी खुराणा उपस्थित होत्या. डॉ.ना.ज.पाऊलबुधे संकुलाचे प्रशासक, (संकुल प्रमूख)सखी सावित्री समितीचे पदनिस्थिती झाल्यानंतर संस्थेचे सहसचिव श्री. नाना देशमुख यांनी ही समिती गठन करण्यामागील उद्दिष्ट्ये कार्यवाही काय करता यईल. या विषयी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे यांनी प्रास्तविकात या समिती बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच जेष्ठ शिक्षिका प्रा.आशा गावडे यांनी समितीची काय कार्येअसतात त्या बद्दल सांगितले.
प्रा.सौ.अर्चना कर्डिले यांनी परिपत्रकाचे वाचन केले. संस्थेचे खजिनदार प्रा.दादासाहेब भोईटे यांनी समितीचा मुख्य उद्देश व विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कार्यवाही करावी याबद्दल माहिती सांगितली. डॉ.मंजिरी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांमध्ये विवेकाचा भाव कसा निमार्ण करता येईल या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी
प्राचार्या डॉ.खुराणा यांनी विद्यार्थ्यांच्या शारिरीक, मानसिक व भावनिक विकास घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जावेत अशी सूचना केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली वैष्णवी इंगळे, प्रेम पवार, कार्तिकी मुळीक, आदित्य रासकर यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या.
या सभेसाठी प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा मॅडम, सचिव नाना देशमुख, खजिनदार प्रा . दादासाहेब भोईटे, प्राचार्य भरत बिडवे, डॉ. मंजिरी कुलकर्णी, माजी नगरसेविका सौ.संध्याताई पवार, प्रा.भारती थोरवे, प्रा.क्रांती घोडके, अंगणवाडी सेविका चिप्पा राजश्री, प्राचार्या सुचित्रा डावरे, पालक सदस्य शुभांगी ढाकणे, महिला पोलिस भाग्यश्री भिटे हे उपस्थित होते. या सभेचे सुत्रसंचलन प्रा.अर्चना कर्डीले यांनी केले तर आभार प्राचार्य भरत बिडवे यांनी मानले.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com