महालक्ष्मीआई देवस्थान माळीवाडा येथे रविवारी यात्रा उत्सव
अहमदनगर (प्रतिनिधी)
सालाबाद प्रमाणे आषाढी अमावस्या रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी माळीवाडा येथील जागृत नवसाला पावणारी लक्ष्मी आई यात्रा संपन्न होणार आहे. महालक्ष्मी आई पालखीचे मानकरी मुख्य भगत पोपटराव (नाना) साठे यांच्या हस्ते प्रवरासंगम येथून कावडीने आणलेले गंगा स्नान सकाळी ७ वाजता देवी आईचा पंचामृताने अभिषेक होणार आहे व दुपारी बारा वाजता.
देवीचे मुख्य भगत पोपटराव साठे व देवस्थानचे अध्यक्ष उमेश साठे यांच्या राहते घरापासून देवीच्या पुरातन महालक्ष्मी मुखवटेंची पादुकांची व सुहासिनी कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे व साडेबारा वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे.
सर्व समाज भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मातंग समाज पंच कमिटी व महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष उमेश साठे यांनी केले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com